जातीचे बनावट दाखले बनविणाºया टोळीचा पदार्फाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 01:22 PM2017-08-16T13:22:01+5:302017-08-16T13:23:28+5:30

स्कँनर, प्रिंटर साहित्यासह दोघांना अटक

Gang of fake identity certificates | जातीचे बनावट दाखले बनविणाºया टोळीचा पदार्फाश

जातीचे बनावट दाखले बनविणाºया टोळीचा पदार्फाश

Next
ठळक मुद्देआरोपींकडून स्कॅनर, प्रिंटरच्या साहित्यासह जातीचे २४ बनावट दाखले जप्त १५ रोजी रात्री अडावद पोलिसांनी ही कारवाई केलीरँकेट उघड होण्याची शक्यता
नलाईन लोकमत अडावद, ता.चोपडा , दि...१६ :जातीचे बनावट दाखले तयार करून, आदिवासी बांधवांना गंडविणाºया दोघांना अडावद पोलिसांनी सापळा रचुन गजाआड केले आहे. आरोपींकडून स्कॅनर, प्रिंटरच्या साहित्यासह जातीचे २४ बनावट दाखले जप्त केले. १५ रोजी रात्री अडावद पोलिसांनी ही कारवाई केली. यामागे असलेले संपूर्ण रँकेट उघड होण्याची शक्यता आहे. अडावद येथील पाटचारी वस्तीवर जातीचे बनावट दाखले देणारे येणार असल्याची गुप्त माहिती अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संतोष पारधी यांना मिळाली. त्यांनी ही माहिती सपोनि जयपाल हिरे यांना सांगीतली. सपोनि जयपाल हिरे यांच्या आदेशान्वये संतोष पारधी, संदीप चतुर, मोसिन पठाण यांनी पाटचारी भागात सापळा रचला. रात्री १० वाजेच्या सुमारास गमेश पावरा (२८, रा.सत्रासेन) मोटार सायकलने त्या वस्तीवर दाखल झाला. पोलीसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेत विचारपुस केली असता त्याची भंबेरी उडाली. त्याने मला माफ करा आशा गयावया करु लागला. पोलीसांना मिळालेल्या माहितीची खात्री झाल्याने त्याला पोलीस ठाण्यात आणले आसता त्याने आपला साथीदार भुपेद्र प्रेमचंद शर्मा (२८, रा.लासूर,ता.चोपडा) हा यात सहभागी आसल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ भुपेद्र याच्या खोलीवर छापा मारुन त्यास ताब्यात घेतले. त्याच्या कडुन स्कँनर, प्रिंटर आदि साहित्य जप्त करीत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Gang of fake identity certificates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.