रिंगणगावात वानराच्या उत्तरकार्यात गावजेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:52 PM2017-08-02T16:52:48+5:302017-08-02T17:10:15+5:30
वृद्ध वानराच्या मृत्यूनंतर पोलीस पाटलांसह 350 जणांनी केले केशदान
ऑनलाईन लोकमत
रिंगणगाव, जि.जळगाव, दि.2 - रिंगणगाव येथे एका वृद्ध वानराचा मृत्यू झाल्यानंतर येथील ग्रामस्थांनी त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करीत दशक्रिया विधी केला. यावेळी 350 जणांनी मुंडण करीत गावभोजण देत भूतदया जोपासण्यात आली. रिंगणगाव येथून जवळच असलेल्या पिंपळकोठा रस्त्यावर आजारी अवस्थेत बसलेल्या वानराचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. या मयत वानरास राममंदिरात आणण्यात आले. ढोल ताशाच्या गजरात अंत्ययात्रा काढण्यात आली. वानराला अंतिम निरोप देण्यासाठी आबालवृद्ध, तरुण, महिला यांनी गर्दी केली होती. ग्रामस्थांनी या वानराच्या मृत्यूनंतर सूतक देखील पाळण्यात आले. पोलीस पाटील वासुदेव मोरे यांनी केशदान करीत अंतिम विधी पार पाडला. यावेळी 350 जणांनी मुंडन केले. सूतक काळात घराघरातून देवपूजा बंद करण्यात आली. तर कोणीही दाढी, कटींग केली नाही, तसेच टोप्या घातल्या नाहीत. वानराचे उत्तरकार्य नुकतेच पार पडले. यावेळी गावजेवण देण्यात आले.