गंगापुरी धरण उशाशी अन् पाडळे गाव शिवार उपाशी, दुष्काळाची दाहकता : आॅन दी स्पॉट रिपोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 06:01 PM2018-10-28T18:01:25+5:302018-10-28T18:05:37+5:30
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पाडळे बुद्रूक व पाडळे खुर्द या गावांच्या उशाशी गंगापुरी लघुसिंचन प्रकल्पाचे धरण उशाशी असताना मात्र, अत्यल्प व अनियमित अशा ७० टक्के पावसामुळे दोन्ही गावांच्या नळपाणीपुरवठा व शिवारातील तब्बल ९० ते १०० फूट खोल विहिरींमध्ये गतवर्षीच्या जूनअखेरप्रमाणे केवळ चार पाच फूट भूजलसाठ्याचा उपसा केवळ अर्ध्या ते पाऊण तासात होत असल्याने शिवारातील काही शेतकऱ्यांनी पूर्णची पूर्ण, काहींनी निम्मे, तर काहींनी तीन चतुर्थांश उभ्या ऐन निसवणीवरील मृगबहार केळीबागांची जड अंत:करणाने बुंध्यापासून खोडं कापून फेकली आहेत.
रावेर, जि.जळगाव : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पाडळे बुद्रूक व पाडळे खुर्द या गावांच्या उशाशी गंगापुरी लघुसिंचन प्रकल्पाचे धरण उशाशी असताना मात्र, अत्यल्प व अनियमित अशा ७० टक्के पावसामुळे दोन्ही गावांच्या नळपाणीपुरवठा व शिवारातील तब्बल ९० ते १०० फूट खोल विहिरींमध्ये गतवर्षीच्या जूनअखेरप्रमाणे केवळ चार पाच फूट भूजलसाठ्याचा उपसा केवळ अर्ध्या ते पाऊण तासात होत असल्याने शिवारातील काही शेतकऱ्यांनी पूर्णची पूर्ण, काहींनी निम्मे, तर काहींनी तीन चतुर्थांश उभ्या ऐन निसवणीवरील मृगबहार केळीबागांची जड अंत:करणाने बुंध्यापासून खोडं कापून फेकली आहेत. यामुळे दुष्काळाची भीषण दाहकता हिवाळ्याच्या आरंभीच आॅक्टोबर महिन्यात जाणवू लागली आहे. आजच्या या भीषण दाहकतेचे उन्हाळ्यातील भवितव्य पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणारे असल्याने उभय ग्रामस्थ धरण उशाशी अन् गाव मात्र उपाशी या भीतीने चिंताग्रस्त आहेत.
तालुक्यातील पूर्व भागात सिंचनाचा अनुशेष असलेल्या पाडळे बुद्रूक, पाडळे खुर्द, निरूळ,अहिरवाडी, खानापूर, चोरवड, कर्जोद, वाघोड या गावांना हिवाळ्यातील आॅक्टोबरमध्येच दुष्काळाची भीषण दाहकता जाणवू लागली आहे. त्यातल्या त्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या व गंगापुरी हे लघुसिंचन प्रकल्पाचे धरण उशाशी असलेल्या पाडळे बुद्रूक व पाडळे खुर्द या गुणात्मक दर्जाच्या केळीचा बादशाह असलेल्या गाव व शिवारात दुष्काळाची तीव्रता कमालीची शिगेला पोहोचली आहे. पाडळे बुद्रूक शिवारातील चंद्रकांत चावदस महाजन यांनी चार हजार खोडे असलेली मृगबहार केळीबाग शनिवारी कापून फेकल्याची विदारक परिस्थिती आहे. रमेश माधव येवले यांनी सहा हजार खोडांपैकी तीन हजार केळीची उभीे खोडं, धीरज अरूण पाटील यांनी चार हजारांपैकी दीड हजार खोडं, रमेश मुरलीधर महाजन यांनी पूर्ण अडीच हजार केळीबागेची उभी खोडे मुळासकट कापून फेकल्याची चिंताजनक परिस्थिती आहे.
दरम्यान, पाडळे खुर्द येथील विष्णू तेलंग्रे यांच्यावर तीन हजार केळीबागेची खोडे कापून फेकण्याचे भूजलसंकट कोसळले. गोपाळ सारंगधर पाटील यांनी पाच हजार खोडांपैकी अडीच हजार केळीची खोडं कापून फेकल्याने दिवसेंदिवस दुष्काळाच्या दाहकतेचे तीव्र चटके जाणवू लागले आहेत.
पाडळे बुद्रूक व खुर्द शिवारासह दोन्ही ग्रामपंचायतींच्या नळपाणीपुरवठा योजनेच्या विहिरींची खोली तब्बल ९० फुट खोलीपर्यंत आहे. असे असताना गतवर्षीच्या उन्हाळ्यातील जूनखेर पावेतोची अवघी पाच ते सहा फूट जलसाठा अवघ्या पाऊण ते एक तासाच्या उपश्यात रिकामा होत असल्याने मे- जूनमध्ये मृगबहार केळीची लागवड करून लागवड पूर्व व आंतरमशागतीसह न्यूट्रीशन व फर्टिगेशनवर अफाट खर्च करून नवजात शिशुप्रमाणे निसवणीवर असलेल्या केळीची केलेली जोपासना पाण्याअभावी मातीमोल ठरल्याने शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे. उत्पादन खर्चासह एक वर्षाचे हातचे जेमतेम खरिपाचे येणारे उत्पन्नही बुडाल्याने उभय शेतकरीवर्ग कर्जाच्या खाईत बुडाला आहे.
दरम्यान, ज्या शेतकºयांकडे किमान सात-आठ फूट भूजलसाठा आहे. त्यांनी पाण्याच्या दोन आवर्तनात येणाºयो हरभरा पिकाचे नियोजन केले आहे. मृगबहार केळीबागा फेकल्या जात असल्याने कांदेबाग लागवडीसाठी कुणीही पुढे येत नसल्याची शोकांतिका आहे. तद्वतच, अधिक पाण्याच्या पाळ्यांवरील मका वा गहू या रब्बी पिकांची लागवड करण्याकडेही शेतकºयांनी पाठ फिरवली आहे. मात्र, पावसाअभावी शेतजमिनीत किंचितही ओल नसल्याने जिरायत शेतकºयांना दरवर्षीप्रमाणे हरभरा लागवड करणे दुरापास्त झाले आहे.
दोन्ही गावातील नळपाणीपुरवठा योजनेच्या तब्बल ९० फूट विहिरींमध्ये आजमितीस केवळ सहा ते सात फूट भूजलसाठा असल्याने आजमितीस एकदिवसा आड तीन-चारही व्हॉल्व्हांना २० ते २५ मिनिटे नळपाणीपुरवठा केला जात असल्याने उन्हाळ्यातील मे जूनमध्ये दुष्काळाची दाहकता तोंडचे पाणी पळवणारी ठरणार असल्याची विदारक परिस्थिती आहे.
पाडळे बुद्रूक गावचा उपसरपंच असलो तरी विहीर खोदकाम करण्याची स्वत: हातमजुरी करीत असून, यंदासारखी दुष्काळाची गंभीर दाहकता आयुष्यात प्रथमच पाहत आहे. सुमारे ९० फूट खोल विहिरीत ५० ते ६० फूट भूजलसाठा राहणाºया विहिरींमध्ये यंदा गतवर्षीच्या उन्हाळ्यातील किमान सहा ते आठ फूट भूजल साठ्याप्रमाणे यंदा आॅक्टोबरच्या या हिवाळ्यातील परिस्थिती असल्याने दोन्ही गावांवर पिण्याच्या पाण्याची टंचाईसह केळी बागायत माहे मे ते जून अखेरपावेतो पूर्णत: भस्मसात झाल्याचे सुन्न करणारे दाहक चित्र ग्रामस्थांची झोप उडवणारे ठरणार आहे.
-फकिरा आबास तडवी, उपसरपंच, ग्रामपंचायत, पाडळे खुर्द, ता.रावेर
/>