भुसावळला दरोडय़ाच्या तयारीतील टोळी गजाआड, गावठी टक्का, तलवार जप्त

By admin | Published: June 10, 2017 12:52 PM2017-06-10T12:52:17+5:302017-06-10T12:52:17+5:30

आरोपींच्या ताब्यातून गावठी कट्टा, तलवार तसेच पाईप, दोरी आदी दरोडय़ाचे साहित्य जप्त करण्यात आल़े

Ganges, gaft, and sword were seized by the gang, preparing for the raids in Bhusawal | भुसावळला दरोडय़ाच्या तयारीतील टोळी गजाआड, गावठी टक्का, तलवार जप्त

भुसावळला दरोडय़ाच्या तयारीतील टोळी गजाआड, गावठी टक्का, तलवार जप्त

Next

ऑनलाईन लोकमत

भुसावळ, जि. जळगाव, दि. 10 - नाकाबंदी दरम्यान दरोडय़ाच्या तयारीत असलेली पाच टोळी पकडण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आल़े आरोपींच्या ताब्यातून गावठी कट्टा, तलवार तसेच पाईप, दोरी आदी दरोडय़ाचे साहित्य जप्त करण्यात आल़े
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी मध्यरात्री एक ते शनिवारी पहाटे पाच वाजेदरम्यान कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आल़े शहरातील जामनेर रोडवरील एका हॉटेलच्या आडोशाला काही संशयित असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकून आरोपींना अटक केली़
तस्लीम उर्फ काल्या श़ेसलीम (रा़दीनदयाल नगर), विष्णू परशुराम पथरोड (25, वाल्मीक नगर), जितु किसन गोडाले (26, वाल्मीक नगर), पवन मनोज ढंढोरे (21़, वाल्मीक नगर), शम्मी प्रल्हाद चावरीया यांना अटक करण्यात आली़ आरोपींविरुद्ध हवालदार राजेंद्र शिवसिंग तोडकर यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला़ 

Web Title: Ganges, gaft, and sword were seized by the gang, preparing for the raids in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.