मनोज लोहारांविरुद्ध पकड वॉरंट
By Admin | Published: January 8, 2017 01:05 AM2017-01-08T01:05:23+5:302017-01-08T01:05:23+5:30
जळगाव : खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयात गैरहजेरीमुळे चाळीसगावचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्याविरुद्ध शनिवारी जळगाव न्यायालयाने पकड वॉरंट जारी केले आहे.
जळगाव : खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयात गैरहजेरीमुळे चाळीसगावचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्याविरुद्ध शनिवारी जळगाव न्यायालयाने पकड वॉरंट जारी केले आहे. लोहार यांनी तत्कालीन जि.प.सदस्य डॉ.उत्तमराव महाजन यांच्याकडे खंडणी मागितल्याच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात न्यायालयात तारखांना ते वारंवार गैरहजर राहत असल्याने न्या.ए.के.पटनी यांनी शनिवारी पोलीस अधीक्षकांच्या नावाने लोहार यांच्याविरुध्द पकड वारंट काढले. सरकारतर्फे सरकारी वकील केतन ढाके तर लोहार यांच्या वतीने अॅड.केदार भुसारी यांनी काम पाहिले.