जिल्हा क्रीडा संकुला समोरच कचऱ्याचा ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:14 AM2021-02-15T04:14:49+5:302021-02-15T04:14:49+5:30
डाक विभागातर्फे पेंन्शन अदालतीचे आयोजन जळगाव : जळगाव डाक विभागातर्फे २५ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेंन्शन विषयक तक्रारींसाठी अदालतीचे ...
डाक विभागातर्फे पेंन्शन अदालतीचे आयोजन
जळगाव : जळगाव डाक विभागातर्फे २५ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेंन्शन विषयक तक्रारींसाठी अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पांडे डेअरी चौकातील मुख्य डाक कार्यालयात दुपारी ४ वाजता ही अदालत होणार असून, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी तक्रारी मांडण्याचे आवाहन डाक विभागातर्फे करण्यात आले आहे.
वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी
जळगाव : कवयित्री बहिणाबाई उद्यानातून मू. जे. महाविद्यालयाकडे जाताना महामार्गावर भुयारी मार्गाचे काम सुरू असून, या कामामुळे दररोज वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. परिणामी यामुळे पादचारी नागरिकांना रस्ता ओलांडतांना तारेवरची कसरत करावी लागत असून, या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
अतिक्रमण हटविण्याची मागणी
जळगाव : रेल्वे स्टेशनसमोर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत विविध खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या लागत असल्यामुळे वाहतूक कोंडी उद्भवत आहे. यामुळे स्टेशनकडे जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने येथील अतिक्रमण हटविण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
गोदावरी एक्स्प्रेस जळगावहून सोडण्याची मागणी
जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून मनमाडहून मुंबईसाठी धावणारी गोदावरी एक्स्प्रेस जळगावहून सोडण्यावर येथील प्रवाशांसाठी मोठ्या प्रमाणावर सोयीचे होणार आहे. विशेष म्हणजे मुंबईला जाण्यासाठी या गाडीला तात्काळ आरक्षण मिळणार असल्याने, प्रवाशांचा त्रासही वाचणार आहे. त्यामुळे मुंबईसाठी गोदावरी एक्स्प्रेस मनमाडहून सोडण्याऐवजी जळगावहून सोडण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.