या ठिकाणी आढळले कचऱ्यांचे ढीग व तुंबलेल्या गटारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:13 AM2020-12-08T04:13:14+5:302020-12-08T04:13:14+5:30
या ठिकाणी आढळले कचऱ्यांचे ढीग व तुंबलेल्या गटारी : १) ‘लोकमत’ प्रतिनिधीने दक्षता नगर, प्रताप नगर, गणेश कॉलनी रोड, ...
या ठिकाणी आढळले कचऱ्यांचे ढीग व तुंबलेल्या गटारी :
१) ‘लोकमत’ प्रतिनिधीने दक्षता नगर, प्रताप नगर, गणेश कॉलनी रोड, दत्त कॉलनी, शाहू नगर व रिंगरोड लगत असलेल्या भागांची पाहणी केली. या सर्व ठिकाणी कचऱ्यांचे ढीग साचलेले दिसून आले. यामध्ये पोलीस लाईन शेजारी असलेल्या दक्षता नगरकडे जाताना प्रवेशद्वाराजवळच मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा ढीग दिसून आला. गेल्या चार दिवसांपासून हा कचरा पडला असल्याचे रहिवाशांनी सांगितले.
२) रिंगरोडवरही गाजरे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच मोठा कचऱ्याचा ढीग साचलेला होता. या ठिकाणीदेखील पूर्वी कचराकुंडी असल्यामुळे वेळेवर कचरा उचलण्यात येत होता; मात्र आता कचराकुंडी नसल्यामुळे तीन ते चार दिवस हा कचरा तसाच पडून राहत असल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले.
३) शाहू नगरमध्येही कचराकुंडी नसल्यामुळे रस्त्यावरच नागरिकांनी कचरा टाकलेला दिसून आला. वेळेवर कचरा न उचलल्यामुळे पाळीव प्राण्यांनी हा कचरा सर्वत्र पसरविला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती.
इन्फो :
शाहू नगरात कुठेही नियमित स्वच्छता ना गटारींची साफसफाई वेळेवर केली जात नाही. कचरा चार ते पाच दिवस तसाच पडून राहतो. आरोग्य विभागाकडे तक्रार करुनही दखल घेतली जात नाही.
रईस बागवान. रहिवासी, शाहू नगर
पूर्वी कचराकुंडी भरल्यानंतर, तत्काळ उचलण्यात येत होती; मात्र आता कचराकुंडी नसल्यामुळे नागरिक रस्त्यालगतच कचरा टाकत आहेत. तसेच हा कचराही वेळेवर उचलला जात नाही. चार ते पाच दिवस या ठिकाणीच पडून असतो.
विराज शिंदे, रहिवासी. दक्षता नगर.
मनपाकडून वेळेवर कचरा उचलण्यात येत नाही. गटारींचीदेखील नियमित साफसफाई होत नसल्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसराकडे अधिकारी किंवा पदाधिकारी यांनी दुर्लक्ष केले आहे.
सय्यद फारुख, माजी नगरसेवक, प्रताप नगर.