गारबर्डी धरण ओव्हर फ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 05:47 PM2020-07-24T17:47:24+5:302020-07-24T17:48:34+5:30
सातपुडा पर्वत रांगेतील सुकी नदीवर असलेले गारबर्डी धरण २४ रोजी ओव्हर फ्लो झाले आहे.
चिनावल, ता.रावेर, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वत रांगेतील सुकी नदीवर असलेले गारबर्डी धरण २४ रोजी ओव्हर फ्लो झाले आहे.
सातपुडा पर्वत निसर्गरम्य ठिकाणी सुकी नदीवर असलेले धरण पर्यटकांसह परिसरातील विशेष करून रावेर व यावल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. आज धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे.
धरणाच्या सांडव्यावरून दोन ते तीन सेंटीमीटर पाणी फेकले जात आहे. यामुळे सुखी नदी वाहती राहणार आहे. नदी प्रवाहाच्या आजूबाजूच्या शेतीला नदीच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. यामुळे शेतकºयांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
याशिवाय रावेर-यावलसह संपूर्ण जिल्हाभरात पर्यटक येथे धरणाचा निसर्गरम्य रूप व सांडव्यावरून फेकले जाणारे फेसाळ पाणी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करीत असते.