गॅस सिलिंडर स्फोटात यावलला महिला भाजली
By admin | Published: June 2, 2017 12:28 PM2017-06-02T12:28:19+5:302017-06-02T12:28:19+5:30
साने गुरूजी शाळेच्या पाठीमागील गाडगे नगरातील तुकाराम सपकाळे यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होवून सपकाळे यांच्या प}ी मंगला सपकाळे (50) या भाजल्या गेल्या़
Next
ऑनलाईन लोकमत
यावल,दि.2 - साने गुरूजी शाळेच्या पाठीमागील गाडगे नगरातील तुकाराम सपकाळे यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होवून सपकाळे यांच्या प}ी मंगला सपकाळे (50) या भाजल्या गेल्या़ घरातील 30 हजारांच्या रोकडसह जीवनावश्यक वस्तू जळाल्याने एक लाख दोन हजार सातशे रुपयांचे नुकसान झाले.
ही घटना गुरूवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. अंजाळेचे तलाठी एन.व्ही.मिसाळ, एस.एस.तायडे यांनी नुकसानीचा पंचनामा केला़
गॅस कंपनीचे संचालक माणिक भिरूड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सपकाळे यांच्या मुलीचे नुकतेच लगA झाल्याने लगAाच्या आहेराचे आलेले 30 हजार रुपये एका डब्यात ठेवलेले होते. त्यातील काही अर्धवट तर काही नोटा जळून खाक झाल्या़ घरातील टीव्ही, मिक्सर, धान्य घरावरील पत्रे , कपडे जळाल्याने एक लाख दोन हजार सातशे रुपयाचे नुकसान झाले आहे.