सायकलला वाचविताना गॅस टॅँकर उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:57 PM2020-05-11T12:57:11+5:302020-05-11T12:57:19+5:30

जळगाव : समोरुन येणाऱ्या सायकलस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने गॅस भरलेला टँकर निंबाच्या झाडावर धडकल्याची घटना रविवारी सकाळी ...

 The gas tanker overturned while rescuing the bicycle | सायकलला वाचविताना गॅस टॅँकर उलटला

सायकलला वाचविताना गॅस टॅँकर उलटला

Next


जळगाव : समोरुन येणाऱ्या सायकलस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने गॅस भरलेला टँकर निंबाच्या झाडावर धडकल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता महामार्गावर खेडी परिसरात घडली. या घटनेनंतर चालकाने पळ काढला. गॅस गळती किंवा स्फोट झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असता. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. दरम्यान, या घटनेनंतर टँकर चालक अन्वर फरार झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत गॅस कंपनी गॅस भरलेले टॅँकर (क्र.एम.एच.४३ वाय ९८०१) मुंबई येथून नागपूर येथे जात असताना रविवारी सकाळी दहा वाजता खेडी गावानजिक महामार्गावर समोरुन सायकलस्वार येत होता. त्याला वाचविताना टॅँकर चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे टॅँकर थेट निंबाच्या झाडाला धडकला व पलटी झाला. या घटनेनंतर गॅस गळतीच्या भीतीने चालक अनवर फरार झाला. नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले. लोकांनी ही माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविली.
फरार चालकाला आणले शोधून
सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, योगेश बारी व चालक भूषण सोनार तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. टँकरची तपासणी करण्यासाठी एमआयडीसीती भारत गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. स्थानिक अधिकारी मनोज वर्मा व सहकाºयांनी टॅँकरची तपासणी केली असता कुठेही गळती नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर क्रेन मागवून टॅँकर उचलण्यात आले. फरार झालेल्या चालकाला पोलिसांनी शोधून आणून ताब्यात घेतले.

Web Title:  The gas tanker overturned while rescuing the bicycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.