चाळीसगावात मित्र-मैत्रिणींचे २९ वर्षांनंतर झाले ‘गेट टु गेदर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 06:40 PM2018-11-21T18:40:13+5:302018-11-21T18:41:18+5:30
१९८८ मध्ये राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज मध्ये बारावी (विज्ञान) वर्गात शिकणाऱ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे स्नेहमिलन येथे नुकतेच झाले. २९ वर्षांनंंतर भेटलेल्या मित्र-मैत्रिणींनी हरविलेल्या आठवणींचे काही हळवे क्षण एन्जॉय केले.
चाळीसगाव, जि.जळगाव : १९८८ मध्ये राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज मध्ये बारावी (विज्ञान) वर्गात शिकणाऱ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे स्नेहमिलन येथे नुकतेच झाले. २९ वर्षांनंंतर भेटलेल्या मित्र-मैत्रिणींनी हरविलेल्या आठवणींचे काही हळवे क्षण एन्जॉय केले. भेटीचा मनमुराद आनंदही उपभोगला. आ.बं.हायस्कूलचे शिक्षक मिलिंद शेलार यांनी आपल्या मित्र-मैत्रिणींना एकत्र जमविले.
स्नेहमिलन सोहळ्यात माजी प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव यांच्यासह प्रा.सूर्यवंशी, संजय राजपूत, प्रा. वानखेडे, प्रा. बडगुजर, प्रा. भिरुड, प्रा.पी.ए.पाटील, प्रा.वाय.आर.पाटील यांनी मार्गदर्शन केले.
१९८८ मध्ये बारावीत शिकणारे हे सर्व मित्र-मैत्रिणी नोकरी व व्यवसायानिमित्त परदेशासह, पुणे, मुंबई, नाशिक येथे वास्तव्यास आहेत. स्नेहमिलन सोहळ्यानिमित्त ते सर्व एकत्र आले आणि एकमेकांना दिलखुलास भेटलेही.
मिलिंद शेलार यांच्यासह अजय देशमुख, बाळू झगडे, अतुल देवकर, किरण पाटील, प्रतिभा पाटील, मनीषा पाटील, दिनेश राजपूत, नितीन पाटील, विलास वाणी, नितीन घाटे, महेंद्र पाटील, जितेंद्र बोरसे, मंगेश साळुंखे, आशुतोष जगताप आदी उपस्थित होते. शाळेला देणगीही देण्यात आली.