मुक्ताईनगर तालुक्यातील नाभिक समाज बांधवांचा मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 01:57 PM2021-02-02T13:57:47+5:302021-02-02T13:58:27+5:30

मुक्ताईनगर तालुक्यातील नाभिक समाज बांधवांचा मेळावा उत्साहात पार पडला.

The gathering of the nuclear community in Muktainagar taluka is in full swing | मुक्ताईनगर तालुक्यातील नाभिक समाज बांधवांचा मेळावा उत्साहात

मुक्ताईनगर तालुक्यातील नाभिक समाज बांधवांचा मेळावा उत्साहात

googlenewsNext

मुक्ताईनगर : तालुक्यातील नाभिक समाज बांधवांचा मेळावा सोमवारी मोठ्या उत्साहात झाला. नाभिक समाज तालुका कार्यकारिणी निवड, समाजातील  नवनिर्वाचित ग्रा.पं सदस्य, उल्लेखनीय काम करणारे कर्मचारी आणि कोविड योद्ध्यांचा सन्मान करून मेळावा संस्मरणीय झाला.
संत सेना महाराज, जिवाजी महाले, वीरभाई कोतवाल यांच्या प्रतिमा पूजनाने मेळाव्याची सुरवात झाली.
अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष नाना शिरसाठ, तर प्रमुख म्हणून जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र नेरपगार होते.  कार्यक्रमाचे मार्गदर्शक रामभाऊ शंकर टोंगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष मनोहर खोंडे, चंद्रकांत शिंदे, कुमार श्रीरामे, शिवाजीराव बहाडकर, जगदीश वाघ, संजय वाघ, भिकन बोरसे, प्रशांत बानाईत, युवा उद्योजक कुणाल गालफाडे, अभियंता लक्ष्मीकांत सावखेडकर,
डी.एस. चौधरी, भैय्या वाघ उपस्थित होते.
मेळाव्यात कोरोना योद्धा म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे, तालुका वैद्यकीय अधिकारीडॉ.नीलेश पाटील व ॲम्बुलन्स चालक गोपाळ टोंगळे यांचा नाभिक समाजातर्फे सत्कार करण्यात आला.
 नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य गोपाळा आमोदे (नायगाव), कविता श्रीराम सनांसे(रुईखेडा), सोनाक्षी दीपक श्रीखंडे (चांगदेव), लक्ष्मी नरेंद्र टोंगळे (बोहार्डी),   माजी सरपंच संतोष रामभाऊ खोरखेडे (वढोदा), कडुभाऊ जयराम बाभुळकर (मेळसांगवे) यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर  मुक्ताईनगर तहसीलचे कर्मचारी जिल्हा आदर्श पुरस्कार मिळालेले गजानन टोगळे यांच्यासोबत नाभिक कर्मचारी संघटना पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
नाभिक समाज तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
तालुकाध्यक्षपदी गणेश अशोक टोंगे, उपाध्यक्ष श्रीराम काशिनाथ सनांसे (रुईखेडा), प्रमोद आंबेकर (कुऱ्हा ), सुधाकर हरी सनांसे (अंतुर्ली),  सचिव किशोर हरीभाऊ हातकर (लोहारखेडा),  कार्याध्यक्ष मनोहर बाबुराव सनांसे (मुक्ताईनगर),  सहकार्याध्यक्ष उमेश जमकर (वढोदा), संघटक संजय गंगे (कुऱ्हा),  संघटक संजय एकनाथ चव्हाण (मुक्ताईनगर), प्रसिद्धीप्रमुख ईश्वर भास्कर सोनवणे (निमखेडी बुद्रूक), संजय रामदास टोंगळे, प्रवक्ता बंडू राजाराम सूर्यवंशी, महिला प्रतिनिधी शोभा कडू सनांसे, राणी धनराज श्रीखंडे यांची निवड करण्यात आली.
मेळाव्यास सुभाष सनांसे, रघुनाथ श्रीखंडे, एकनाथ लोंढे, गजानन टोंगळे, सुनील श्रीखंडे, नितीन सनांसे, गौरव बाबुळकर, बाळू श्रीखंडे, सुधाकर चौधरी, भास्कर मालवेकर, दीपक श्रीखंडे, सचिन मालवणकर, शंकर सनांसे, रवींद्र लोंढे, अजय येउतकर, गणेश आमोदकर, गणेश तायडे, मनोज टोंगळे, सुंदरलाल चौधरी, बापू मालवेकर, छगन मोरस्कर, गणेश लोंढे, लखन सनांसे, धनराज श्रीखंडे, कैलास वाघ आदी उपस्थित होते.
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितीन चव्हाण, भैया श्रीखंडे, पवन सोनवणे, संतोष रोढे, पंकज सनांसे, अरुण वाघ, सागर श्रीखंडे, आकाश सनांसे, विशाल चव्हाण, कमलेश चव्हाण, मुकेश वाघ, नीलेश वाघ आदी समाज बांधव उपस्थित होते.

Web Title: The gathering of the nuclear community in Muktainagar taluka is in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.