गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह युवक पोलीसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 08:44 PM2020-12-10T20:44:26+5:302020-12-10T20:45:34+5:30

मोटारसायकलवर अमळनेर येथे पिस्तुलासह जाणाऱ्या १९ वर्षीय युवकास शहरालगतच्या बोरखेडा फाट्यावर रावेर पोलीसांनी गुप्त खबरीवरून जाळ्यात घेतला.

Gawthi Katta and youth with live cartridges in the police net | गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह युवक पोलीसांच्या जाळ्यात

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह युवक पोलीसांच्या जाळ्यात

googlenewsNext
ठळक मुद्देरावेर : बोरखेडा फाट्यावर रावेर पोलीसांची कारवाई ; ३५ हजार रू चा मुद्देमाल जप्त

रावेर : मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर जिल्ह्य़ातील हातोटी गावातून ११ हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तूल मॅगेझीन व जिवंत काडतुसासह मोटारसायकलवर अमळनेर येथे घेवून जाणाऱ्या १९ वर्षीय युवकास शहरालगतच्या बोरखेडा फाट्यावर रावेर पोलीसांनी गुप्त खबरीवरून जाळ्यात घेतला. त्याच्याकडून मोटारसायकल, गावठी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतूस असा ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळालेल्या एका गोपनीय खबरीवरून त्यांनी गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यासाठी सहायक फौजदार इस्माईल शेख, जिल्हा पोलीस शाखेचे पोलिस नाईक महेंद्र सुरवाडे, पो. काॅ. सुरेश मेढे, कुणाल पाटील, प्रमोद पाटील, विशाल पाटील यांचे पोलीस पथक नेमले.
दरम्यान, आरोपी साईम जानबाझ तडवी (१९, ख्वाॅजानगर, बंगाली फाईल, अमळनेर) याने बऱ्हाणपूर जिल्ह्य़ातील हातोटी गावातून १० हजार रूपये  किमतीचा एक लोखंडी (बीड) धातूची गावठी पिस्तूल त्याचे बटवर प्लास्टिक ग्रीप असलेल्या मॅगझीनसह एक ५०० रू किमतीचे जिवंत काडतूस खरेदी केले. अमळनेर येथे तो मोटारसायकल (क्र एम एच -१९ /ई- ८८१९)ने हे पिस्तुल घेऊन जात होता. त्यास रावेर पोलिसांच्या पथकाने पाताळगंगा परिसरातील बोरखेडा फाट्यावर आज दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास जेरबंद केले. आरोपीच्या ताब्यातील १० हजार रूपये किमतीचा गावठी कट्टा, ५०० रूपये किमतीचे जिवंंत काडतूस व २५ हजार रू किमतीचे असे एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार इस्माईल शेख, जिल्हा पोलीस शाखेचे पोलिस नाईक महेंद्र सुरवाडे, पो. काॅ. सुरेश मेढे, पो. काॅ. कुणाल पाटील, पो. काॅ. प्रमोद पाटील, पो. कॉ. विशाल पाटील यांनी ही कारवाई केली.
विशाल शिवाजी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, रावेर पोलिसात आर्म ऍक्ट. कलम ३ (२५)प्रमाणे आरोपी साईम जानबाझ बेलदार (वय १९) रा अमळनेर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे रावेर परिसरात एकच खळबळ उडाली असून, सीमेलगतच्या मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातच गावठी कट्ट्याची अवैध विक्री होत असल्याने गुन्हेगारीला बळ देणाऱ्या अड्डयावर कठोर कारवाई होण्याची मागणी होत आहे.

Web Title: Gawthi Katta and youth with live cartridges in the police net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.