गाय चोरीच्या संशयावरुन दोघांना बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:48 PM2019-05-09T12:48:38+5:302019-05-09T12:50:15+5:30

मालवाहू वाहनासह दोघं तरुण ताब्यात

Gaya suffers from cow slaughter | गाय चोरीच्या संशयावरुन दोघांना बेदम मारहाण

गाय चोरीच्या संशयावरुन दोघांना बेदम मारहाण

Next

जळगाव : चोरलेल्या गायी बाहेरगावी घेऊन जात असल्याच्या संशयावरुन निलेश योगेंद्र वोनोले (२४) व दर्शन गोकुळ सोनवणे (२२) दोन्ही रा.मुक्ताईनगर, जळगाव या दोन्ही तरुणांना जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी साडे दहा वाजता दूध फेडरेशनजवळील रेल्वे गेटजवळ घडली. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही गायी, वाहन व संबंधित तरुणांना ताब्यात घेतल्याने मोठी घटना टळली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजू बिसमिल्ला पटेल (४०, रा.दांडेकर नगर, जळगाव) यांचा गुरे पाळण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे लहान मोठे मिळून ३५ गायी आहेत. या सर्व गायी गोठ्यात बांधलेल्या असतात.
१ मे रोजी संजू पटेल गायींचे दूध काढण्यासाठी गोठ्यात गेले असता दूध काढणाऱ्या अमोल महाजन याला दोन गायी गायब झालेल्या दिसल्या. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतरही गायी मिळून न आल्याने चोरी झाल्याची खात्री पटली.
बुधवारी सकाळी साडे दहा वाजता एका मालवाहू वाहनातून (क्र.एम.एच.१९ बी.एम.०२७२) या दोन्ही गायी जात असल्याचे गॅरेजवर काम करणारा सईद फारुख पटेल या तरुणाला दिसले.
त्याने लगेच संजू पटेल यांना मोबाईलवर संपर्क करुन माहिती दिली.
पटेल येण्याआधी तेथे जमलेल्या तरुणांनी वाहनातील दोन्ही तरुणांना चोपून काढले.
आमदारांनी गाठले पोलीस ठाणे
दिवसभराच्या घडामोडीनंतर सायंकाळी तक्रार मागे घेऊन प्रकरण आपसात मिटविण्यासाठी प्रयत्न झाले. त्यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून दोन्ही गटाची बाजू समजून घेतली. पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्या दालनात बराच वेळ चर्चा चालली. पटेल यांनी फिर्याद दिली, मात्र गुन्हा दाखल झालेला नव्हता.
पोलिसांचा हद्दीचा वाद
घटनास्थळावर वाद वाढल्याने त्यांना लोकांनी तालुका पोलीस ठाण्यात नेले. तेथे नेल्यावर घटनास्थळ हे जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने तक्रार येथे घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पटेल यांनी शहर पोलिसांशी संपर्क साधला. तेथील कर्मचाऱ्यांनी तालुका पोलीस ठाण्यात येवून गायी, वाहन व संशयित तरुणांना ताब्यात घेतले. या गायी आम्हाला दुसºयाने दिल्या असून अडावद येथे घेऊन जात असल्याने दोघांनी स्पष्ट केले. दरम्यान, या गायी बेवारस फिरत असल्याने आम्ही गोशाळेत नेत असल्याचे मालकाने सांगितले. एकूणच प्रत्येकवेळी वेगवगेळी माहिती मिळत असल्याने गुंता अधिक वाढला होता.

Web Title: Gaya suffers from cow slaughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव