बोदवड येथे आरोप प्रत्यारोपात आटोपली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 07:04 PM2018-12-24T19:04:52+5:302018-12-24T19:06:13+5:30

बोदवड , जि.जळगाव : आरोप आणि प्रत्यारोपात बोदवड नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा सोमवारी सकाळी पार पडली. या सभेला मुख्याधिकाºयांसह सत्ताधारी ...

General Assembly of Nagar Panchayat ended in allegation in Bodhwa | बोदवड येथे आरोप प्रत्यारोपात आटोपली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा

बोदवड येथे आरोप प्रत्यारोपात आटोपली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांसह सत्ताधारी भाजपाचे पाच नगरसेवक गैरहजरमुदत देऊनही कामे होत नसल्याने पुन्हा मुदतवाढ का द्यावी?विविध विषयांवर विरोधी गटातील सदस्यांनी घेतला आक्षेप

बोदवड, जि.जळगाव : आरोप आणि प्रत्यारोपात बोदवड नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा सोमवारी सकाळी पार पडली. या सभेला मुख्याधिकाºयांसह सत्ताधारी भाजपाचे नऊपैकी पाच सदस्य गैरहजर होते. मुदत देऊनही कामे होत नसल्याने पुन्हा मुदतवाढ का द्यावी, असा प्रश्न उपस्थित करीत विरोधी गटातील सदस्यांनी विविध विषयांवर आक्षेप घेत विरोध नोंदविला.
सभेला सकाळी अकराला सुरुवात झाली. सभेत २१ विषय मंजुरीसाठी मांडण्यात आले. त्यात पहिलाच विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यास विरोधी गटातील सदस्यांनी नकार दिला व नामंजूर करण्यात आले. विषय पत्रिकेतील दुसरा विषय शहरातील स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेच्या व्यवस्थापन सल्लागाराची मुदत वाढविण्यासाठीही विरोधकांनी नकार देत अगोदरच पाणी व्यवस्थापन सल्लागार तोंड दाखवत नाही तर त्याला मुदतवाढ कशाला असा विरोध केला. तसेच विषय क्रमांक १४ ते २० वर नगरसेवकांच्या मेमोवर टिपण तयार करण्यात न आल्याने ते विरोधकांनी नामंजूर केले, तर शहरातील विकास कामांना मुदतवाढीलाही विरोधकांनी विरोध करीत अगोदरच मुदत देऊनही काम केले जात नाही. त्यांना मुदतवाढ देऊ नये, असे सांगत विरोध दर्शवला.
मंजूर विषय
नगर पंचायतीच्या सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याच्या विषयाला मंजुरी मिळाली, ग्राम पंचायत काळातील सिंचन विहिरींच्या ३५ प्रकरणाला जिल्हाधिकाºयांच्या परवानगीसाठी मंजुरी दिली.
नगरपंचायतीचे ट्रॅक्टर चोरीला
सभागृहात नगरसेवक दीपक झांबड यांनी, शहरात ज्या कामाना मुदत संपल्यावर दोन महिन्यांनीही बांधकाम विभाग कोणत्या हक्काने मंजुरी न मिळवता मुदतवाढ करून देते, असे सांगत अगोदर गटारीचे काम; मगच रस्त्याचे काम असे शासकीय प्रपत्र असताना विषय क्रमांक तेराला विरोध केला.
सभागृहातील विरोधी गटातील गटनेते देवेंद्र खेवलकर यांनी नगर पंचायतीच्या मालकीचे ट्रॅक्टर टँकरसह चोरी गेल्याचे सांगितले. यावर नगर पंचायतीचे स्वच्छता अभियंता अमित कोलते यांनी बाजार समितीच्या आवारात लावल्याचे सांगितले, तर खेवलकर यांनी ते विना परवानगीने दुसºयाच्या कामासाठी वापर चालू असल्याचे सांगत काय चालू आहे, असे सांगितले.
दरम्यान, सभा सुरू असताना मुख्याधिकाºयांच्या अनुपस्थितीचा मुद्दा निघाला तेव्हा नगरपंचायतीचे कार्यालय अधीक्षक राजूसिंग चव्हाण यांनी, ते कामानिमित्त सभेला येऊ शकले नसल्याचे सांगितले.
 

Web Title: General Assembly of Nagar Panchayat ended in allegation in Bodhwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.