सामान्य माणूस हिच माझी लेखन प्रेरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 06:10 PM2017-10-12T18:10:41+5:302017-10-12T18:11:16+5:30
‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात प्रा.संजीव गिरासे यांनी आपल्या लेखन प्रेरणेविषयी केलेला उलगडा.
लेखनाची उर्मी अंतरमनातून उमटते. संवेदना अक्षरातून प्रकट होतात. जे डोळ्यांनी पाहिलं, मनाने अनुभवलं आणि शब्दांनी सावरलं अशी ही लेखन प्रक्रिया असते. मला लेखनाची प्रेरणा मिळते ती समाजातून. समाजातील व्यक्ती जेव्हा माङया लेखनातील व्यक्तीरेखा बनतात त्याच पुढे लेखन काळातील माङया प्रेरणा ठरतात. त्यांच्यामुळेच माङयाकडून लेखन होतं, असं माझं प्रामाणिक मत आहे. समाजात आपल्या अवतीभवती घडणा:या घटनांमधून कथाबीज मिळतं. मग मनाला चटका लावून जाणा:या व्यक्ती, जगण्याची त्यांची धडपड, त्यांचा संघर्ष आणि संघर्षातून मिळालेलं यश, अपयश, नैराश्य, आनंद यांचं गणित मांडताना मिळणारा आनंद, त्यांच्यातील समरसता हीच माझी लेखन प्रेरणा आहे. आणखीन एक माझं समीकरण मी केलं आहे. सामान्य माणूस समाजातील व्यवस्थेत नेहमीच तो भरडला जातो. सारं तो सोसत असतो अगदी मनाच्या विरुद्ध. व्यवस्थेच्या विरोधात जाण्याचं बळ त्याच्यात नसतं हे वास्तव मी कसं विसरणार? तशाच व्यक्तीरेखा माङया साहित्यातून आकार घेत असतात. बंड, विद्रोह सामान्य माणूस करू शकत नाही. आजचा शेतकरी व्यवस्थेकडून नागवला जातो. आंदोलनात किती शेतकरी स्वयंप्रेरणेने आलेले असतात, हा प्रश्न प्रश्नच राहतो. प्रत्येकाला आपलं पोट भरण्याची पडली आहे. राजकारण, मोर्चे, आंदोलन हे त्यांच्या मनाला स्पर्शत नाही. हे केलं तर त्याने खावं काय? शेतात घाम कुणी गाळायचा? तसंच नोकरी व्यवसायातल्या सामान्य माणसाचं झालंय.. कुणी स्वयंकेंद्रितचा आरोप करेल; पण सत्य नाकारून चालणार नाही. सामान्य माणूस विद्रोह करण्यासाठी अजून अवकाश आहे, असं माझं स्वत:चं मत आहे. सामान्य माणूसच माझी खरीखुरी लेखन प्रेरणा आहे. इतर साहित्यिकांचं साहित्य ही माङया लेखन शैलीला आकार देण्याचे कार्य करते. माङया चिंतनाला रंगही भरते. ाहित्यिक मित्रांशी केलेली चर्चा ही माङया लेखनाचं बळ आहे.