देशभरात लवकरच जेनेरिक औषधीची अंमलबजावणी : केंदीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर
By admin | Published: April 30, 2017 06:11 PM2017-04-30T18:11:10+5:302017-04-30T18:11:10+5:30
शेतक:यांचा उत्पादन खर्च कमी करण्यावर भर. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण शून्य टक्क्यांवर आणणार
Next
जळगाव,दि.30- जेनेरिक औषधी ब्रॅण्डेड कंपन्यांच्या औषधीच्या तुलनेत केवळ 10 ते 20 टक्क्यातच मिळत असल्याने ती सर्वसामान्यांना परवडणारी आहे. सोबतच परिणामकारकही असल्याने ही औषधी वापराची देशभरात सर्वत्र लवकरच अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
डॉक्टरांनी जेनेरिक औषधीच लिहून द्यावी व त्यासाठी सरकार कडक नियम करणार असल्याचे गेल्या आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. त्या संदर्भात अहिर यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले जेनेरिक औषधी वापराकडे कल वाढत असून त्या स्वस्तदेखील असल्याने गरीबांना कमी दरात उपचार मिळू शकतात. त्यामुळे याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. राज्यांनीही याचा स्वीकार करावा, असेही ते म्हणाले.
रखडलेल्या प्रकल्पांना मदत करणार
सिंचन योजनेबाबत बोलताना अहिर म्हणाले की, वाढत्या सिंचनामुळे रब्बीचे उत्पन्न चांगले आले असून यंदा हंगाम दुप्पट येणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आणखी सिंचनक्षेत्र वाढण्यासाठी रखडलेल्या प्रकल्पांनाही मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेतक:यांचे उत्पादन खर्च कमी करणार
शेती मालाला हमी भाव मिळण्याविषयी बोलताना अहिर म्हणाले की, शेतक:यांचा उत्पादन खर्च कमी करण्यावर सरकारचा भर आहे. त्यासाठी खताचे भाव कमी करण्यात आले आहे. उत्पादन खर्च कमी झाल्यास शेतक:यांना सहज परवडू शकते असे सांगून ते म्हणाले हमी भाव देऊन ग्राहकांनाही खरेदीसाठी ते परवडले पाहिजे. या सर्वाचा समतोल साधण्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे हा उत्तम पर्याय असल्याने सरकारचा त्यावरच भर असल्याचे ते म्हणाले. शेतक:यांनी शेळी पालन, कुक्कुट पालन,मधमाशी पालन या सारख्या पूरक व्यवसायावरही भर देण्याचे आवाहन केले.
तुरीवरून केवळ राजकारण
तूर खरेदीबाबत विरोधक केवळ राजकारण करीत आहे. आम्ही लाखो क्विंटल तूर खरेदी केली असून त्यांनी कधी एक लाख क्विंटल तरी तूर खरेदी केली का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कापसाला आम्ही वाढीव भाव दिल्याचा दावा त्यांनी केला.
शेतक:यांचे आत्महत्यांचे प्रमाण शून्य टक्क्यावर आणणार
सरकारच्या धोरणामुळे शेतक:यांचे आत्महत्यांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा करीत हंसराज अहिर म्हणाले की, हे प्रमाण शून्य टक्क्यावर आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहे.