स्वयंरोजगारातून प्राप्त करा प्रगतीची सुवर्णसंधी
By admin | Published: March 27, 2017 03:59 PM2017-03-27T15:59:22+5:302017-03-27T15:59:22+5:30
प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विविध योजना अंमलात आल्या आहेत. मुद्रा बँक योजनेच्याद्वारे लहान मोठय़ा व्यावसायिकांना अर्थसहाय्य करण्याची योजना आहे.
Next
गिरीष महाजन : मुद्रा मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव,दि.27- सर्व सामान्य माणसाचं जीवनमान उंचवावे यासाठी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विविध योजना अंमलात आल्या आहेत. मुद्रा बँक योजनेच्याद्वारे लहान मोठय़ा व्यावसायिकांना अर्थसहाय्य करण्याची योजना आहे. या योजनेची माहिती जाणून स्वयंरोजगाराची सुरुवात करुन आपल्या प्रगतीची सुवर्णसंधी साध्य करा, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन यांनी सोमवारी येथे केले.
जिल्हास्तरीय मुद्रा बँक समन्वय समितीतर्फे जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मुद्रा लोन मेळावा झाला. उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उज्जवला पाटील, जळगावचे आमदार सुरेश भोळे, विधानपरिषद आमदार चंदूभाई पटेल,महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, उपविभागीय अधिकारी जलज शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ उपस्थित होते.
महाजन म्हणाले की, मुद्रा बँक योजना ही व्यवसाय उद्योगासाठी विनातारण कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना आहे. आपल्या देशातील बेरोजगारीची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी स्वयंरोजगाराला चालना देणारी ही योजना आहे. आपल्या व्यवसायासाठी बँकांमध्ये जाऊन या योजनेची माहिती घ्या आणि आपल्या प्रगतीची सुवर्णसंधी साधा, असे आवाहन त्यांनी केले.
सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले तर तहसिलदार अमोल निकम यांनी आभार मानले.