सावट इथले दूर होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 12:53 PM2018-11-10T12:53:27+5:302018-11-10T12:54:10+5:30

नोटाबंदीच्या दोन वर्षांनंतरही अद्यापही परिणाम कायम

Get out of here! | सावट इथले दूर होईना

सावट इथले दूर होईना

googlenewsNext

विजयकुमार सैतवाल
जळगाव : देशातील काळा पैसा बाहेर यावा, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी नोटाबंदीचा घेण्यात आलेला निर्णय सर्वच क्षेत्राच्या मुळावर आल्याने दोन वर्षानंतरही त्याचे सावट दूर झालेले नाही. जळगावातील सुवर्ण व्यवसाय असो की पाईप उद्योग यांना याचा मोठा फटका बसला. जळगावातील महत्त्वाचा उद्योग असलेल्या पाईप उद्योगावरील सावट अद्यापही दूर झालेले नाही तर दुसरीकडे स्वॅपच्या भुर्दंडाने ग्राहक त्रस्त आहेत.
देशातील काळा पैसा बाहेर यावा, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी करण्यात आली. देशाच्या विकासासाठी नागरिकांनी प्रचंड हालअपेष्टा सहन करीत पंतप्रधानांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले. ५० दिवसानंतर स्थिती पूर्वपदावर येईल, नागरिकांचे हाल थांबतील, बँकांमध्ये चलन वाढेल, कॅशलेससाठी स्वॅपचा मोठा वापर वाढेल, अशी आशा होती. स्वॅपचा वापर वाढला मात्र त्याचा भूर्दंड ग्राहक अथवा व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. इतकेच उद्योग, व्यापार क्षेत्रावर नोटाबंदीच्या दोन वर्षांनंतरही अद्यापही परिणाम कायम आहे. सुवर्ण व्यवसाय यातून सावरला असला तरी वर्षभर व्यवसायावर झालेले परिणाम न विसरण्यासारख्या असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. बांधकाम क्षेत्रात गुंतवणूकदेखील कमी झाली आहे.
जुन्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर सर्वच व्यवहारांवर त्याचा परिणाम झाला. यातून ५०० वस्तूंची मुख्य बाजारपेठ असलेल्या जळगावातील दाणाबाजारालाही याच्या मोठ्या झळा सोसाव्या लागल्या. नोटाबंदीतून कॅशलेस व्यवहार वाढावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला तरी जळगावात बाजारपेठेत वर्षभरानंतरही असे चित्र नव्हते. आताही कॅशलेससाठी शुल्क आकारले जात असल्याने जनता यापासून लांबच आहे. नोटाबंदीनंतर पहिले आठ दिवस तर दाणाबाजारात शुकशुकाट होता. ‘कॅशलेस’ व्यवहाराची चर्चा असली तरी ग्रामीण भागात अद्यापही या व्यवहाराबाबत नागरिकांच्या मनात भीती आहे. हे नागरिक स्वॅपद्वारे व्यवहार करण्यास धजावत नाही. इतकेच काय धनादेश देण्यासही ते तयार नाही. स्वॅप करताना शुल्क लागत असल्याने व्यापारी व ग्राहकांना झळ बसते. त्यामुळे हे शुल्क रद्द करण्याची मागणी आहे. मात्र दोन वर्षानंतरही तसे झालेले नाही. त्यामुळे कॅशलेसचा उद्देश साध्य होऊ शकलेला नसल्याचे सांगितले जात आहे.
नोटाबंदीनंतर सुवर्ण व्यवसायाला लागलेली घरघर विविध कारणांनी वर्षभर कायम होती. हे एक वर्ष सुवर्ण व्यवसायासाठी कटू आठवणी असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्या नोटा बँकेत जमा झाल्याने नागरिकांच्या हाती पैसा नव्हता. त्यामुळे सुवर्ण व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे ‘सुवर्णनगरी’ अशी ओळख असलेल्या जळगावातील या बाजारात पहिले तीन महिने सामसूम होती. त्यानंतर थोडीफार उलाढाल सुरू झाली, तीदेखील लग्न सराईच्या खरेदीमुळे.
पाईप उद्योग यातून सावरत असला तरी त्याच्यावर अप्रत्यक्ष परिणाम असल्याचे पाईप उद्योगजकांचे म्हणणे आहे. बांधकाम क्षेत्रात मागणी घटल्याने घरांसाठी लागणाºया पाईपचीही विक्री कमी झाली असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. नोटाबंदीमुळे कापड व्यवसायावरील परिणाम अजूनही कायम आहे. नोटाबंदीनंतर या व्यवसायावर ५० टक्के परिणाम झाला व त्याच्या झळा अजूनही कायम आहे.

Web Title: Get out of here!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.