घंटा घणघणल्या...शाळा भरल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 02:10 PM2019-06-17T14:10:19+5:302019-06-17T14:11:01+5:30

चाळीसगावला प्रवेशोत्सवाची धूम : मिटान्न वाटप, पाठ्यपुस्तकांचे वितरण, पुष्पे देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

Ghargharanayla ... School filled! | घंटा घणघणल्या...शाळा भरल्या !

घंटा घणघणल्या...शाळा भरल्या !

Next

चाळीसगवा- प्रदीर्घ उन्हाळी सुटी नंतर सोमवारी शाळांच्या घंटा घणघणल्या आणि विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरु झाल्या. 'स्कुल चले हम...' म्हणत मुलांनी आज शाळेचा पहिला दिवस मस्त एन्जाय केला. शाळांमध्ये प्रवेशोत्सवाची धूम पहावयास मिळाली. मिटान्न देऊन विद्यार्थ्यांचे तोंड गोंड करण्यात आले. काही शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण केले गेले. कुठे वाजत - गाजत तर कुठे गुलाबपुष्पे देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने काही मुलांनी भोकाड पसरवून गोंधळ उडवून दिला.
पाठ्यपुस्तकांचे वाटप, शिरा देऊन तोंड गोड
व्ही.एच.पटेल प्राथ. विद्यालयात सकाळी प्रवेशव्दारावरच संस्थाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, सचीव डॉ. विनोद कोतकर, शाळा समितीचे चेअरमन राजेंद्र चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. पहिल्याच दिवशी गोड शिराही देण्यात आला. विद्यार्थ्यांना नवी पाठ्यपुस्तकेही दिली. यावेळी मुख्याध्यापक भाऊसाहेब जगताप यांच्यासह ना.का.मोरे, सुजाता मोरे, जिजाबराव वाघ, अनिल महाजन सचिन चव्हाण, अजय सोमवंशी, प्रशांत महाजन, सचिन पाखले आदी उपस्थित होते.
डॉ.प्रमिलाताई पुर्णपात्रे प्राथ. विद्यालय, हरणाताई जोशी प्राथ.विद्यालय, आदर्श प्राथ. विद्यालय, गुडशेफर्ड विद्यालय, ग्रेस व टॉलडर्स अकॕडमी, आ.ब.मुलींचे विद्यालयात चेअरमन अॕड. प्रदीप अहिरराव यांच्या उपस्थित प्रवेशोत्सव झाला. राष्ट्रीय प्राथ.विद्यालय, एच.एच.पटेल प्राथ.विद्यालय आदींसह नगरपरिषदेच्या शाळांमध्येही विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा झाला. मुख्याध्यापक डॕनियल दाखले, विश्वास बारिस यांनी हस्तादोंलन करीत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आ.बं.विद्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दारात देखील विद्यार्थी शाळा प्रवेश सोहळा झाला.
जि.प.शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचा जल्लोष
तालुक्यात जि.प.च्या १९० शाळा असून यात उर्दु माध्यमाच्या शाळांचाही समावेश आहे. सोमवारी सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव झाला. शनिवारी आणि रविवारी शिक्षकांनी शाळेसह परिसराची स्वच्छता करुन प्रवेशोत्सवाची तयारी पूर्ण केली होती. सोमवारी सकाळी शाळांच्या प्रवेशव्दारावर रांगोळ्या, पताकांचे तोरण बांधून वाजत- गाजत विद्यार्थ्यांचे स्वागत केले गेले. पाठ्यपुस्तकांचे वितरण आणि मिटान्न देऊन विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश यादगार केला. काही शाळांमध्ये बैलगाडी मधून विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत नेण्यात आले. केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद प्रवेशोत्सवासाठी सज्ज झाले होते.

Web Title: Ghargharanayla ... School filled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.