अमळनेर फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची रुग्णालयांना भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 07:16 PM2018-12-05T19:16:09+5:302018-12-05T19:19:23+5:30

डी.फार्मसी अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण करून विद्यार्थ्यांना रुग्णालयांमध्ये फार्मासिस्ट म्हणून रोजगाराच्या खूप संधी उपलब्ध आहेत. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात रुग्णालयात असलेल्या विविध विभागांचे कामकाज कसे चालते याचा अनुभव व्हावा म्हणून अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित कॉलेज आॅफ फार्मसीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासन संचलित ग्रामीण रुग्णालय, अमळनेर व नर्मदा मेडिकल फाउंडेशन संचलित रुग्णालय व साने गुरुजी क्रिटीकल केअर सेंटरला भेट दिली.

Gift to hospital students of Amalner Pharmacy College | अमळनेर फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची रुग्णालयांना भेटी

अमळनेर फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची रुग्णालयांना भेटी

googlenewsNext
ठळक मुद्देविविध विभागांचे कामकाज कसे चालते याचा अनुभव व्हावा म्हणून दिली भेटविद्यार्थ्यांनी केली विविध विभागांची पाहणी

अमळनेर, जि.जळगाव : डी.फार्मसी अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण करून विद्यार्थ्यांना रुग्णालयांमध्ये फार्मासिस्ट म्हणून रोजगाराच्या खूप संधी उपलब्ध आहेत. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात रुग्णालयात असलेल्या विविध विभागांचे कामकाज कसे चालते याचा अनुभव व्हावा म्हणून अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित कॉलेज आॅफ फार्मसीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासन संचलित ग्रामीण रुग्णालय, अमळनेर व नर्मदा मेडिकल फाउंडेशन संचलित रुग्णालय व साने गुरुजी क्रिटीकल केअर सेंटरला भेट दिली.
यात विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात असलेले आयुष विभाग, क्षय-रोग विभाग, एच.आय.व्ही.विभाग, बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, औषधी वितरण विभागांची ओळख होऊन प्रत्यक्षात कामकाज अनुभवता आले. तसेच तज्ज्ञ सर्जन डॉ.अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाउंडेशन संचलित क्रिटीकल केअर सेंटरमध्ये असलेली आधुनिक आरोग्य सेवा प्रणालीची जवळून ओळख झाली. डॉ.महेश रासुरे, डॉ.संदीप जोशी, ग्रामीण रुग्ण्यालयाचे डॉ.पी.के.ताडे, डॉ.तुषार शेलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या यशस्वी रुग्णालय भेटीसाठी प्राचार्य रवींद्र गंगाराम माळी, प्रा.अनिल बोरसे, प्रा.रुपाली पाटील, ज्ञानेश्वर चौधरी व पंकज पवार यांनी परिश्रम घेतले.
मंडळाचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल, फार्मसीचे चेअरमन योगेश मुंदडे व मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Gift to hospital students of Amalner Pharmacy College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.