दातृत्व : समाजासाठी दोन रुग्णवाहिका, कुटुंब नायकांना स्वतंत्र वाहनाची अधिवेशनात भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:50 PM2018-02-04T12:50:01+5:302018-02-04T12:50:08+5:30
कुटुंब नायकांचा मानपत्र देऊन सन्मान
डी.बी. पाटील / ऑनलाईन लोकमत
पाडळसे, जि. जळगाव, दि. 4 - समाज कार्यासाठी स्वत:ला झोकून अहोरात्र काम करणा:या कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी स्वतंत्र वाहन दिले. या सोबतच यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी यांनी दुचाकी दिली तर भुसावळ येथील सुहास गोपाळराव चौधरी व योगेश वासुदेव पाटील यांनी समाजासाठी लेवा पाटील समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशन रुग्णवाहिका दिल्या.
भोरगाव लेवा पंचायतीच्यावतीने पाडळसे येथे आयोजित लेवा पाटील समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर कुटुंबनायक यांच्या कार्याचा गौरव करण्यात येऊन त्यांना समाजकार्यासाठी एकनाथराव खडसे यांनी वाहन दिले. या सोबतच भुसावळ येथील सुहास गोपाळराव चौधरी यांनी वडिलांच्या स्मरणार्थ व योगेश वासुदेव पाटील यांनी समाजासाठी रुग्णवाहिका दिल्या. यामुळे समाजास मोठी मदत होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
कुटुंब नायकांचा मानपत्र देऊन सन्मान
अधिवेशनात कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांचा मान्यवरांच्याहस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. माजी आमदार नीळकंठ फालक यांनी मानपत्राचे वाचन केले.