गिरीश भाऊ का जादू चल गया..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:56 PM2018-08-04T13:56:12+5:302018-08-04T13:58:25+5:30

मनपा निवडणुकीत ५७ जागा जिंकून भाजपाने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. सुरेशदादा जैन यांची ४० वर्षांची सत्ता संपुष्टात आणण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना यश आले आहे.

Girish Bhau's magic went on. | गिरीश भाऊ का जादू चल गया..

गिरीश भाऊ का जादू चल गया..

googlenewsNext
ठळक मुद्देजळगाव महापालिकेत घडविला इतिहासभाजपाला मिळवून दिले दणदणीत यशखडसे समर्थक ६ पैकी ५ उमेदवार पराभूत

जळगाव : मनपा निवडणुकीत ५७ जागा जिंकून भाजपाने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. सुरेशदादा जैन यांची ४० वर्षांची सत्ता संपुष्टात आणण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना यश आले आहे. जामनेरच्या निवडणुकीत १०० टक्के यश महाजन यांनी मिळवून दिले, त्यानंतर पालघर, नाशिकमध्येही त्यांनी पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले.
जळगाव मनपाची निवडणूकही त्यांच्या नेतृत्त्वाखाली लढविण्यात आली. इतर निवडणुकांप्रमाणे येथेही त्यांनी यश मिळवून दिल्याने गिरीश भाऊ का जादू चल गया... अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटल्या.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर हाती कमळ घेतलेले सर्वचे सर्व १६ नगरसेवक मनपा निवडणुकीत विजयी झाले आहेत तर अन्य पक्षातून शिवसेनेत गेलेले तिघे उमेदवार पराभूत झाले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर १८ विद्यमान नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला. यापैकी १६ नगरसेवकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना भाजपाने उमेदवारी दिली व सर्व विजयी झाले. त्यात शिवसेनेतून भाजपात गेले महापौर ललित कोल्हे, माजी महापौर सदाशिव ढेकळे, माजी नगराध्यक्षा सिंधुताई कोल्हे, माजी उपमहापौर भारती सोनवणे, राष्टÑवादीचे गटनेते सुरेश सोनवणे आदींनी विजय मिळविला. राष्ट्रवादीच्या नगरसेविका मुख्तारबी रसूल पठाण, भाजपाचे पृथ्वीराज सोनवणे तसेच राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष निलेश पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला, मात्र हे तिघेही पराभूत झाले. या सर्व आयाराम गयारामांकडे जळगावकरांचे लक्ष होते.
खडसे समर्थक ६ पैकी ५ उमेदवार पराभूत
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या ६ समर्थकांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपाला जबरदस्त यश मिळाले असताना सुनील माळी, अशोक लाडवंजारी, सुनील खडके, रवींद्र पाटील, शरिफा तडवी, अनिल देशमुख या ६ खडसे समर्थकांपैकी केवळ सुनील खडके हे विजयी झाले तर इतर ५ जण पराभूत झाले. पराभूतांपैकी सुनील माळी हे भाजपाचे मनपातील गटनेते तर रवींद्र पाटील आणि अनिल देशमुख हे विद्यमान नगरसेवक होते. भाजपाच्या विजयाच्या लाटेचा अनेक नवख्यांनाही लाभ झाला असताना या विद्यमानांना त्याचा फायदा होवू शकला नाही, यावरही राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली आहे.
मराठा समाजाचे भाजपाचे १२ उमेदवार विजयी
भाजपाने मराठा समाजातील १४ उमेदवार दिले होते. यापैकी १२ उमेदवार निवडून आले. यामुळे मराठा समाजही भाजपाच्या बाजूने उभा राहिला असा दावा, पक्षातर्फेच करण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाची नाराजी भाजपाला भोवणार असे बोलले जात असताना याचा परिणाम झाला नसल्याचाही दावा पक्षातर्फे करण्यात आला आहे.
विद्यमान ४६ पैकी ३१ नगरसेवक विजयी १५ पराभूत
विद्यमान ४६ नगरसेवक रिंगणात होते. त्यापैकी ३१ नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली तर १५ नगरसेवकांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. यामध्ये श्यामकांत सोनवणे, जयश्री नितीन पाटील, पृथ्वीराज सोनवणे, वर्षा खडके, अमर जैन, दीपाली पाटील, सुनील माळी, लीना पवार, रवींद्र पाटील, संगीत दांडेकर, अनिल देशमुख, अश्विनी देशमुख, चेतन शिरसाळे, ममता कोल्हे, लता मोरे यांचा समावेश आहे.
खडसेंना जमले नाही ते महाजनांनी करुन दाखविले
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे मनपा निवडणुकीच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. जे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना जमले नाही ते महाजन यांनी करुन दाखविले. त्यांच्या या यशामुळे जिल्हा नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे या विजयाचे गिफ्ट म्हणून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद तसेच राज्याचे गृहमंत्रीपदी त्यांना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Girish Bhau's magic went on.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.