खडसे यांनी पाडणाऱ्यांची पुराव्यानिशी नावे सांगावी, गिरीश महाजन यांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 04:12 AM2019-12-07T04:12:53+5:302019-12-07T04:15:04+5:30
दरवेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हेच त्यांना लढत देत आहेत.
जळगाव : विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांना पाडणाऱ्यांची नावे एकनाथ खडसे यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिल्याचे ते सांगत आहेत. त्यांनी ती नावे गुप्त न ठेवता पुराव्यानिशी थेट जाहीर करावीत, असे आव्हान माजी मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांना दिले आहे.
पत्रकार परिषदेत महाजन म्हणाले की, कुणीच कुणाला पाडत नसते. त्यांना अपयश आले, याचे आम्हालाही वाईट वाटते. मुक्ताईनगर मतदार संघातून खडसे हे यापूर्वीही अॅड. रवींद्र पाटील यांच्याविरोधात १,२00 मतांच्या फरकाने आणि मागील निवडणुकीत प्रचंड मोदी लाट असतानाही केवळ ८,५00 मतांनी निवडून आले आहेत.
यावेळी खडसे यांना तिकिट नव्हते. त्यामुळे फरक पडला.
दरवेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हेच त्यांना लढत देत आहेत. यावेळी तिथे अटीतटीचा सामना होता. त्यातच शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीनही पक्ष तिथे एकत्र आले होते. त्यामुळेच १५00-२000 मतांचा फरक पडला.
त्यावर भाजपमधीलच काहींनी विरोधकांना मदत केल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. त्यांची नावेही पक्षश्रेष्ठींकडे दिली असल्याचा आरोप केल्याबाबत विचारले असता महाजन म्हणाले की, विरोधकांना कोणी मदत केली? त्याचे नाव व पुरावे थेट जाहीरच करावे.
सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. पाडापाडीचे उद्योग आम्ही किंवा पक्षातील कुणीच करत नाही. लढत अटीतटीची होती.