भाजपमध्ये ‘इनकमिंग’साठी केवळ १० टक्के जागा - गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 10:07 PM2019-09-11T22:07:34+5:302019-09-11T22:20:06+5:30

जळगावसह ‘सिटींग’ आमदार असलेल्या जागा भाजपकडेच राहणार

Girish Mahajan - Only 5% seats for 'Incomer' in BJP | भाजपमध्ये ‘इनकमिंग’साठी केवळ १० टक्के जागा - गिरीश महाजन

भाजपमध्ये ‘इनकमिंग’साठी केवळ १० टक्के जागा - गिरीश महाजन

Next

जळगाव : नवीन चेहरे आल्याने जुन्या मंडळींवर अन्याय होतो, असे भाजपमध्ये होत नाही. पक्षात मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ झाले असले तरी पक्षातील जुन्या मंडळींनाच प्रथम प्राधान्य राहणार असून पक्षात येणाऱ्या नव्या चेहऱ्यांपैकी केवळ १० टक्के चेहºयांनाच उमेदवारी दिली जाईल, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात पत्रकार परिषदेत केला. या सोबतच जळगावची जागा भाजपकडेच राहणार असून राज्यातील इतर ठिकाणीही जेथे भाजपचे आमदार आहे, त्या जागा भाजपकडेच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यात जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली असून मित्र पक्षांना १८ जागा दिल्या जाणार असल्याचेही ते म्हणाले.
राज्यातील विविध सिंचन प्रकल्पांसाठी देण्यात आलेल्या निधीविषयी तसेच जळगावातील वैद्यकीय संकुलाच्या इमारतीचे लवकरच भूमीपूजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यासाठी बुधवारी संध्याकाळी गिरीश महाजन यांची जळगावात पत्रकार परिषद झाली, त्या वेळी ते बोलत होते.
१२३ जागा भाजपच लढविणार
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपासंदर्भात भाजप-शिवसेनेची प्राथमिक चर्चा झाली आहे. यात आरपीआय, शिवसंग्राम पक्ष व इतर मित्र पक्षांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जागा देऊ केल्या असून ते नाराज नसल्याचे महाजन म्हणाले. यामध्ये या मित्रपक्षांना १८ जागा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप-शिवसेनेच्या जागा वाटपात सध्या भाजपचे ज्या ठिकाणी आमदार आहेत, त्या जागा भाजपकडेच राहणार असून दोन-तीन जागा इकडे-तिकडे होऊ शकतात, असेही महाजन यांनी सांगितले. यात जळगाव शहर मतदार संघाची जागा भाजपकडेच राहणार असल्याचे सांगत राज्यातील १२३ जागा भाजप लढविणार असल्याचे ते म्हणाले.
मलाही उमेदवारी मिळते की नाही, हे मी सांगू शकत नाही
जळगावची जागा भाजपकडेच राहणार असली तरी उमेदवार कोण असेल हे सांगता येणार नाही. इतकेच काय तर मलाही उमेदवारी मिळते की नाही, हे मी सांगू शकत नाही. कारण भाजपची एक यंत्रणा असून वरिष्ठ पातळीवरून निर्णय होऊन उमेदवारी निश्चित होईल, असे सांगत त्यांनी उमेदवाराबाबत बोलणे टाळणे.
नवीन केवळ १५ चेहरे
राज्यभरात भाजपमध्ये विविध पक्षांच्या मंडळींनी मोठ्या प्रमाणात प्रवेश केला असून यात अनेक दिग्गज आहेत. असे असले तरी पक्षातील जुन्या मंडळींवर अन्याय होणार नसल्याचे महाजन म्हणाले. उमेदवारीमध्ये नवीन येणारे केवळ १५ चेहरेच असतील असेही महाजन यांनी स्पष्ट केले.



 

Web Title: Girish Mahajan - Only 5% seats for 'Incomer' in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.