Girish Mahajan : 'गेंड्याच्या कातड्याचं म्हणावं तर गेंड्यालाही लाज वाटेल इतकं निर्लज्ज सरकार'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 08:44 PM2022-01-07T20:44:06+5:302022-01-07T20:45:37+5:30

गिरीश महाजन यांना राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आणि एसटी बंद असल्याने होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

Girish Mahajan : 'Rhinoceros skin government will be ashamed of the rhinoceros, Girish Mahajan on MVA government | Girish Mahajan : 'गेंड्याच्या कातड्याचं म्हणावं तर गेंड्यालाही लाज वाटेल इतकं निर्लज्ज सरकार'

Girish Mahajan : 'गेंड्याच्या कातड्याचं म्हणावं तर गेंड्यालाही लाज वाटेल इतकं निर्लज्ज सरकार'

Next

जळगाव - जैश-ए-मोहम्मद या जहाल अतिरेकी संघटनेकडून नागपुरात रेकी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे संघ मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. जैश-ए-मोहम्मदसारख्या जहाल संघटनेकडून नागपुरात रेकी झाली असेल, तर हा संघ मुख्यालयासह नागपूरसाठी मोठा धोका मानला जात आहे. दरम्यान, या वृत्तानंतर भाजपा नेते आमदार गिरीश महाजन यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून या जातीयवादी संघटना चवताळल्या असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, राज्य सरकारच्या कामकाजावरही त्यांनी बोचरी टीका केली.  

गिरीश महाजन यांना राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आणि एसटी बंद असल्याने होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना हे सरकार इतिहासातील सर्वात निष्क्रीय आणि निर्लज्ज सरकार असल्याची बोचरी टीका महाजन यांनी केली. 

अतिशय निष्क्रीय सरकार, आजपर्यंतच्या इतिहासातील इतक निष्क्रीय सरकार महाराष्ट्राने पाहिलं नाही. संवेदना नसलेलं, संवेदनाहीन, गेंड्याच्या कातड्याचं म्हणावं तर गेंड्यालाही लाज वाटले, इतकं निर्लज्ज सरकार आहे. कोणाशीही कोणाला घेणं देणं नाही. कुठलाही मंत्री कुठेही आंदोलनकर्त्याला जाऊन भेटत नाही. राज्यातील विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील रक्तवाहिनी असलेली एसटी ही बंद पडलेली आहे, पण कुणालाही घेणं देणं नाही. कोणीही त्यांना जाऊन भेटत नाही. सगळ्यांची आपली-आपली अरेरावी चाललीय. दादागिरी सरकारची चाललीय. म्हणूनच, जनतेचे हाल सुरू असून, एसटीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, वीजेचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, नोकरभरतीचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न वेशिला टांगले आहेत, असे म्हणत महाजन यांनी राज्य सरकारवर टीका केली. 

सरकारची दुटप्पी भूमिका

आमदार गिरीश महाजन यांनी सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल केला आहे. एकासाठी एक न्याय आणि दुसऱ्यासाठी दुसरा का? असा सवाल महाजन यांनी विचारला. सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांबद्दल बोलल्यास लगेच कारवाई होते, पण विरोधी पक्षनेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांवर काहीच कारवाई होत नाही. सोशल मीडियातून सत्ताधार्‍यांबाबत काही जरी बोलले तरी त्यांना अटक होते. तर विरोधकांबाबत अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य करुनही काहीच कारवाई होत नसल्याची बाब ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका महाजन यांनी केली. 
 

Web Title: Girish Mahajan : 'Rhinoceros skin government will be ashamed of the rhinoceros, Girish Mahajan on MVA government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.