गिरीश महाजन यांची हुकूमशाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:15 PM2018-02-21T13:15:51+5:302018-02-21T13:16:39+5:30
धनंजय मुंडे यांची टिका : जामनेरात हल्लाबोल यात्रेला अडथळ्यांचा प्रयत्न
Next
ठळक मुद्देलोकप्रतिनिधींना मारायला सांगितले नाही ..शेतक:यांना सरसकट कजर्माफी होईर्पयत आंदोलन सुरुच ठेवणार
ग रीश महाजन यांची हुकूमशाहीधनंजय मुंडे यांची टिका : जामनेरात हल्लाबोल यात्रेला अडथळ्यांचा प्रयत्नजळगाव- जामनेर येथे हल्लाबोल यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे या ठिकाणी लोकशाही नाही तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची हुकूमशाही आहे, अशी टिका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा सुरु असून या निमित्ताने जळगाव येथे बुधवारी सकाळी राष्ट्रवादीच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत मुंडे यांनी वरील विधान केले. याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांचीही स्वतंत्र पत्रपरिषद झाली. पत्रपरिषदेत मुंडे म्हणाले की, जामनेर येथे मंगळवारी रात्री हल्लाबोल यात्रेदरम्यान पथदिवे बंद केले. सभास्थळ लवकर निश्चित होवू दिले नाही. हे प्रकार पाहता या ठिकाणी लोकशाहीच नाही असे वाटते. परंतु एखादी गोष्ट दडपण्याचा प्रयत्न केला तर ती अधिकच उसळते. याचप्रमाणे जामनेरातही खूपच मोठय़ा प्रमाणात आमच्या यात्रेला प्रतिसाद मिळाला, असेही त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींना मारायला सांगितले नाही ..बोदवड येथील सभेत मुंडे यांनी विधान केले होते की, येथे 29 दिवस पाणी आले नाही तरी लोक गप्प कसे काय? आमच्याकडे तर लोकप्रतिनिधीला खेटराने मारले असते. या विधानाबाबत मुंडे यांनी खुलासा केला की, मी लोकप्रतिनिधीला मारा असे म्हटलो नाही. तर आमच्याकडे लोक एवढे संतापतात इकडे मात्र इतके शांत कसे राहतात हाच फरक मला निदर्शनास आणून द्यायचा होता मात्र मिडिया ब:याचदा काही व्याक्य टि¦स्ट करतात.कॉंग्रेससोबत आज बैठकयेत्या काळात समविचारी पक्षाबरोबर घेवून सरकारला घेरणार असून काँग्रेस पक्षासोबत पहिली बैठक याअधी झाली आहे. 22 फेब्रुवारीला 3 वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या बंगल्यावर मुंबई येथे दुसरी बैठक होणार असल्याचीही माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली. तसेच आगामी निवडणुकीत काँग्रेसोबत आघाडी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील झाले गप्प- तटकरेसहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्री होण्यापूर्वी शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नी खूप बोलायच मात्र त्यांचा आवाजच आता बंद झाला आहे. तसेच शिवसेना दुतोंडी असून मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले की, या वाघाचे गुरगुरणे बंद होते. भाजपा आणि सेना या दोन्ही पक्षातील कुरघोडी आणि कुरबुरीच्या प्रकारामुळे फुकटचा तमाशा लोकांना पहायला मिळत आहे, असेही तटकरे म्हणाले. शेतक:यांना सरसकट कजर्माफी होईर्पयत आंदोलन सुरुच ठेवणार शेतक:यांची कर्जमाफी, शेतक:यांच्या आत्महत्या आणि धर्मा पाटील यांची आत्महत्या हे विषय येत्या अधिवेशनामध्ये आम्ही लावून धरणार आहोत. जोपयर्ंत शेतक:यांना न्याय मिळत नाही आणि सरसकट कजर्माफी दिली जात नाही तोपयर्ंत राष्ट्रवादीचे आंदोलन सुरुच ठेवणार आहे. विविध प्रश्नांवर सरकारला अधिवेशनामध्ये सळो की पळो करुन सोडू असा इशाराही तटकरेंनी दिला.लोकांच्या अपेक्षांचे ओङो घ्यावे लागणार - सुप्रिया सुळेहल्लाबोल यात्रेदरम्यान लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लोकांच्या अनेक अपेक्षा आहेत. लोकांच्या अपेक्षांचे ओङो आम्हाला घ्यावे लागणार आहे. यामुळे या प्रतिसादाचे ‘टेन्शन’ही आहे. मतांच्या अपेक्षेने ही यात्रा नसून सध्याचे राज्यकर्ते नाकर्ते आहेत म्हणून आम्हाला निवडून यायचे नाही, तर आम्ही चांगले आहोत म्हणून आम्हला निवडून यायचे आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. शेतक:यांसाठी नाही पण जाहिरातबाजीसाठी आहे सरकारकडे पैसाशेतक:यांच्य कजर्माफीसाठी तसेच त्याच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत मात्र जाहिरातबाजीवर कोटय़वधी रुपये खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, अशी टिकाही सुप्रिया सुळे यांनी केली. ‘बेटी बचाव’ अभियानाच्या जाहिरातींसाठीही प्रचंड पैसा खर्च केला मात्र याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट महाराष्ट्रात स्त्रीजन्म दर हा आता घटला आहे. पत्र परिषदेला जळगावचे प्रभारी आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, सुरेखा ठाकरे, अॅड. रवींद्र पाटील, विकास पवार, विलास पाटील, कल्पना पाटील आदी उपस्थित होते.