मुलगी पहायला आले पण लग्न करूनच गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:04 PM2020-02-22T23:04:16+5:302020-02-22T23:06:11+5:30

येथे माहेश्वरी समाजातील एका मुलीला पाहण्यासाठी पाहुणे आलेत, मुलगी पसंत पडली, आत्ताच लग्न करावे काय, असा प्रस्ताव एकाने सुचवला, दोन्हीकडच्या प्रमुख ज्येष्ठ मंडळींनी विचाराअंती होकार दिला व बालाजी मंदिरात समाजबांधवांच्या साक्षीने हा विवाह रुढी परंपरांना फाटा देत, मुहूर्त वगैरे न पाहता पार पडला.

The girl came to see, but just got married | मुलगी पहायला आले पण लग्न करूनच गेले

मुलगी पहायला आले पण लग्न करूनच गेले

googlenewsNext
ठळक मुद्देकासोदा येथील घटनामाहेश्वरी समाजबांधवांची उपस्थितीरुढी परंपरांना दिला फाटा

कासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथे माहेश्वरी समाजातील एका मुलीला पाहण्यासाठी पाहुणे आलेत, मुलगी पसंत पडली, आत्ताच लग्न करावे काय, असा प्रस्ताव एकाने सुचवला, दोन्हीकडच्या प्रमुख ज्येष्ठ मंडळींनी विचाराअंती होकार दिला व बालाजी मंदिरात समाजबांधवांच्या साक्षीने हा विवाह रुढी परंपरांना फाटा देत, मुहूर्त वगैरे न पाहता पार पडला. येथील माहेश्वरी मंडळ व माहेश्वरी महिला मंडळाने याकामी पुढाकार घेणाऱ्या सगळ्या मान्यवरांचा माहेश्वरी समाजातर्फे सत्कार केला.
प्रत्येक तरुण तरुणींचे विवाहासंबंधी आकर्षक असते. स्वप्न असतात. आवडीनिवडी असतात. ठरुन विवाह, प्रेमविवाह, पळून जाऊन तर कुणी गुण जुळवून विवाह करतात, परंतु कासोदा येथील प्रदीप हिरालाल झवर यांची फॅशन डिझानर मुलगी पायलला पहायला बेलापूर (श्रीरामपूर) येथील शरद रामनाथ बिहानी यांचा मुलगा रोहित हा एमसीए झालेला मुलगा आला. सकाळी मुलगी पसंत पडली व लागलीच दुपारी समाज बांधवांच्या साक्षीने कुठलाही पारंपरिक रितीरिवाज व मोठा खर्च न करता दोघं उच्चशिक्षित आहेत हेच गुण पाहून वरमाला टाकून रितसर लग्न लावल्याची अनुकरणीय घटना येथे दि.२० रोजी घडलीे.
याकामी मुलाचे मामा मिलिंद मुंदडा, मुलीचे आजोबा गणपती झवर, झवर यांचे जावई सतीश राठी यांनी याकामी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या धाडशी निर्णयाचे कासोदा माहेश्वरी समाज मंडळ व माहेश्वरी महिला मंडळाने कौतुक केले. दोन्हींकडील परिवाराचा सार्वजनिक सत्कार घडवून आणला आहे.
यावेळी माहेश्वरी समाज अध्यक्ष शीतल मंत्री, संजय नवाल, मधुकर समदाणी, जयप्रकाश समदाणी, अनिल मंत्री, डॉ.टावरी, कैलास अग्रवाल यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. गावात या लग्नाची जोरदार चर्चा असून यापुढे असेच विवाह झाले पाहिजेत, अशा प्रतिक्रिया अनेकांना व्यक्त केल्या आहेत.
 

Web Title: The girl came to see, but just got married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.