गळ्यातील सोन्याची पोत लांबविणाऱ्या मुलीला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:14 PM2019-05-28T12:14:39+5:302019-05-28T12:15:09+5:30
फुले मार्केटमधील घटना
जळगाव : फुले मार्केटमध्ये खरेदी करत असतांना एका अल्पवयीन मुलीने बीडच्या महिलेच्या गळ्यातील सात ग्रॅमची सोन्याची मंगलपोत अंत्यत चलाखीने तोडून पळण्याच्या प्रयत्न केला, मात्र महिलेच्या सतर्कतेने हा प्रयत्न फसला असून संशयित मुलीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले तर तिच्या सोबतच्या तीन मुली पसार झाल्या आहेत.सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
रामेश्वर कॉलनी येथील प्रमिला गणेश कदम यांच्याकडे त्याच्या बीड येथील नणंद व नातेवाईक आले आहे. हे नातेवाईक मंगळवारी रात्री बीडकडे रवाना होणार आहेत.
त्यापूर्वी सोमवारी प्रमिला कदम यांच्यासह त्यांच्या बीड येथील नातेवाईक महिला, मुले खरेदी करण्यासाठी दुपारी३ वाजता फुले मार्केटमध्ये आल्या होत्या. एका हातगाडीवर कदम यांची नणंद पर्स बघत होती, यादरम्यान त्याच्या मागे तीन ते चार अल्वयीन मुली होत्या. यावेळी एका १० वर्षाच्या मुलीने उभ्या महिलेल्या अत्यंत चलीखीने गळ्यातील मंगलपोत तोडली. पोत तुटताच महिलेने पोत ओढणाºया मुलीचा हात पकडला. तिला शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.
या मुलीसोबत आणखी तीन मुली होत्या. मात्र तिला पकडल्याचे लक्षात येताच, त्या पळून गेल्याचेही कदम यांनी शहर पोलिसांना माहिती देतांना सांगितले.
लहान मुलींचा सहभाग
महिलेसह तिच्या नातेवाईकांनी मुलीला तिचे आई, वडील व तु कुठली अशी विचारणा केली असता मुलीने आम्ही अकोला येथील असून फुगे विकण्यासाठी सकाळीच शहरात आल्याचे सांगितले. आई, वडील उद्यानात असल्याचे सांगत, महिलांना शामा प्रसाद मुखर्जी उद्यानात घेवून गेली. याठिकाणी मात्र कोणीही नव्हते. खोटे बोलत असल्याची खात्री झाल्यावर महिलांनी तिला पुन्हा शहर पोलीस ठाण्यात आणले.दरम्यान, चोऱ्यांमध्ये आता अल्पवयीन मुलींचा वापर होऊ लागला आहे.