म्हसवे येथे झोक्याची फाशी लागून बालिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 23:39 IST2021-02-10T23:37:44+5:302021-02-10T23:39:22+5:30
झोक्याची फाशी लागून वेदू नितीन पाटील या २ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

म्हसवे येथे झोक्याची फाशी लागून बालिकेचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : झोक्याची फाशी लागून वेदू नितीन पाटील या २ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना म्हसवे ता. पारोळा येथे बुधवारी दुपारी १ वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
म्हसवे येथील रहीवासी नितीन गणेश पाटील यांची २ वर्षाची कन्या वेदू हिला तिच्या आईने झोक्यात टाकले होते. खाली पडू नये म्हणून रुमालाने बांधले असता.त्या रुमालाचीच फाशी लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. आई तिला झोक्यातून बाहेर काढण्यासाठी गेली असता. तिची हालचाल बंद झाली. तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
गोंडस बालिकेची झोक्याची फाशी लागून मृत्यू झाल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत.