चाळीसगावात आईनेच केली मुलीची हत्या
By admin | Published: July 11, 2017 05:57 PM2017-07-11T17:57:38+5:302017-07-11T17:57:38+5:30
पोलिसांनी केली अटक : 15 जुलै पयर्ंत मिळाली पोलिस कोठडी
Next
ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव,दि.11- शिवकॉलनी भागातील सायली अनिल पाटील या विद्यार्थीनीच्या खूनप्रकरणाने नाटय़मय वळण घेतले आहे. आपल्या मुलीच्या खुनाची फिर्याद देणा:या आईला चाळीसगाव पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने 15 जुलैर्पयत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तृतीय वर्ष बीएस्सीला शिकत असणा-या 23 वर्षीय सायली अनिल पाटील हिचा 3 रोजी रात्री 12 वाजेपूर्वी तिच्या जुना मालेगाव रोडस्थित शिव कॉलनीतील राहत्या घरात खून झाला होता. सायलीचा खून झाला त्यावेळी बाजूच्या खोलीत तिचा भाऊ व आई झोपलेले होते. मंगळवारी पोलिसांनी सायलीची आई र}ा अनिल पाटील हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान संशयित रत्ना पाटील हिने सायलीचा खून केल्याचे परिस्थितीजन्य पुरावे आढळून आल्याने चाळीसगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला. दुपारी 1 वाजता पोलीस निरीक्षक रामेश्वर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
खुनाचे रहस्य कायम
सायली हिची हत्या कोणत्या कारणासाठी झाली?, या हत्येत कुणाचा सहभाग आहे का? हे मात्र तपासात समोर आलेले नाही. त्यामुळे या खुनाचे रहस्य कायम आहे. पोलिसांनी 10 ते 12 साक्षीदारांची तपासणी केली. सायलीचे कुटूंब हे मुळचे देशमुखवाडी येथील असून वडील अनिल पाटील हे एसटी महामंडळात वाहक आहेत. घटनेच्या दिवशी ते पंढरपूर येथे बस घेऊन गेले होते.