बांबूच्या बारवर सराव करणारी मुलगी ते ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:20 AM2021-08-14T04:20:05+5:302021-08-14T04:20:05+5:30
मीराबाई चानू ८ ऑगस्ट १९९४ ला मणिपूरमध्ये एका छोट्याशा गावात तिचा जन्म झाला. २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये कुंजीरानी ...
मीराबाई चानू
८ ऑगस्ट १९९४ ला मणिपूरमध्ये एका छोट्याशा गावात तिचा जन्म झाला. २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये कुंजीरानी देवी खेळायला गेल्या. त्यांना पदक मिळाले नाही. मात्र त्याचवेळी लहानआ मीराबाईने त्यांचा आदर्श घेतला आणि या खेळात कारकीर्द करण्याचे ठरवले. मीराबाईने २००७ मध्ये बांबूने बनवलेल्या बारचा वापर करून सराव केला आहे. ती आपल्या जिद्दीच्या जोरावर २०१६ च्या रियो ऑलिम्पिकमध्ये पोहोचली. तिथे तिच्या नावासमोर लिहिले गेले ‘डिड नॉट फिनिश’. तिला एकदाही वजन सहज उचलता आले नाही. तिच्यावर टीका झाली. कठोर शब्दात घरी बसणाऱ्या भारतीयांनी सोशल मीडियावर येथेच्छ टिंगल केली. २०१६ मध्ये ती डिप्रेशनमध्ये गेली. पण २०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिद्दी मीराबाईचा नवा अवतार सगळ्यांना बघायला मिळाला. २०१६ मध्ये भारतीयांनी जिची टिंगल उडवली, त्याच मीराबाईचे २०२१ मध्ये भरभरून कौतुक होत आहे. तिने टोकियोत महिलांच्या ४९ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये ८७ आणि क्लिन ॲण्ड जर्कमध्ये ११५ किलो वजन उचलले आणि पुढच्याचक्षणी देशभरात तिच्या नावाची चर्चा सुरू झाली. ती सिंधूनंतर भारताची फक्त दुसरी रौप्यपदक विजेती महिला खेळाडू आहे.