मुलीचा संसार

By admin | Published: April 29, 2017 05:01 PM2017-04-29T17:01:17+5:302017-04-29T17:01:17+5:30

‘‘हॅलो शोना.. कशी आहेस? मॅरिड लाईफचा पहिला दिवस कसा वाटतोय?’’

Girl world | मुलीचा संसार

मुलीचा संसार

Next

हॅलो... हॅलो...
‘‘हॅलो...
‘‘बोल आई..’’
‘‘हॅलो शोना.. कशी आहेस? मॅरिड लाईफचा पहिला दिवस कसा वाटतोय?’’
‘‘मस्त! एकदम वेगळं वेगळं वाटतय..’’
‘‘हो ना? वाटणारच. अगं.. आपल्या आणि तिकडच्या वातावरणात नाही म्हटलं तरी फरक आहेच ना? तो जाणवणारच.. झाला का चहा? झाला?.. कुणी केला होता गं? सासूबाईंनी का? म्हटलं का येताबरोबर नव्या नवरीला उभी केली..’’
‘‘आई संध्याकाळी तीर्थप्रसादाला या हं..’’
‘‘हो येऊ ना! पण तू दुपारभर आता आराम कर बर का. मस्तपैकी झोप काढ. शिण असतो गं लगAाचा, नाही म्हटलं तरी नाहीतर उगाच इकडची तिकडची कामं करत बसशील विनाकारण.. बरं.. भेटूच संध्याकाळी?..’’
‘‘हॅलोùù’’
‘‘काय म्हणतेय बबडी माझी? कसं चाललंय? बरं, ठरलं का तुमचं फायनली.. अगं फिरायला जाणार होता ना दोघं?’’
‘‘मनालीला जायचं ठरवतोय..’’
‘‘मनाली का? बरंय.. म्हणजे ठिक आहे. नाही, मला आपलं वाटलं की इतकी चर्चा चाललीय घरात, तर कुठे सिंगापूर, मलेशियाला जाताय की काय? आमच्या वेळी काय महाबळेश्वर.. फार तर उटी! पण अलीकडे असं थोडीच आहे! हौस असते अलीकडे लोकांना.. जाऊ द्या. मनाली तर मनाली! कसे जाताय?’’
‘‘आधी ट्रेनने दिल्लीला..’’
‘‘हो कां? रेल्वेने वाटतं? नाही, प्लेनने पण जाता आलं असतं.. तेवढाच तुझा विमान प्रवास झाला असता.. म्हणून म्हटलं गं! बाकी आम्हाला काय? तुम्ही ठरवणार.. तुम्ही जाणार.. एन्जॉय करा म्हणजे झालं’’
‘‘हॅलो’’
‘‘कशी आहेस पिल्लू? आली का परत? कशी झाली ट्रीप?’’
‘‘छान झाली आई..’’
‘‘हो कां? बरं झालं बाई.. नाही म्हणजे तो शिमल्याला हॉटेलचा जरा गोंधळच झाला होता ना? उगीच थांबून राहावं लागलं म्हणे. खरं तर तुम्ही ना, त्या .. टूर्समध्ये पैसे भरायला हवे होते. इतरांपेक्षा चार पैसे जास्त घेतो, तो पण उत्तम सोय करतो.
मी ऐकलयं त्याच्याबद्दल, जाण्याआधी जरा आम्हाला विचारलं असतं तर त्याचा फोन नंबर दिला असता तुला.. जाऊ दे, झाली ना आता ट्रिप?’’
‘‘आई तुङयासाठी स्वेटर आणलंय’’
‘‘अरे वा! पण मावश्यांसाठी आणि मामीसाठी काही आणलं आहेस की नाही? नाही ते लोक प्रत्येक वेळी आपल्यासाठी काही-ना-काही आणतातच - म्हणून म्हटलं. नाही आणलंस का? असू.दे.. खरं तर या व्यवहाराच्या गोष्टी घरातल्या मोठय़ा बाईने सांगाव्या सुनांना.. अनुभव नसतो ना तुम्हा मुलांना! असू दे आता..’’

‘‘हॅलो मुन्नू  कशी आहेस?’’
‘‘बरी आहे आई..’’
‘‘का गं? नुसती बरीच कां? ते जाऊ दे.. काय झालं तुमच्या राहण्याचं? आता तीन महिने होत आले की लगAाला.
त्या मॉडेल कॉलनीत कुठलासा फ्लॅट आहे ना म्हणे? तिकडे जाणार होता ना तुम्ही दोघं? मग?’’
‘‘आई, तो इनव्हेस्टमेंट म्हणून घेतलाय.. त्यात भाडेकरू ठेवायचेय..’’
‘‘बस कां! म्हणजे तुमचं जाणं राहिलचं वाटतं? अगं बेटा हौस असते मुलींना राजा-राणीच्या संसाराची.. सुरुवातीलाच झालं तर झालं.. नंतर काय उपयोग आहे? एकत्र कुटुंबात नाही म्हटलं तरी बंधन येतातच.. मोकळेपणा मिळत नाही. बघ बाई! मला आपलं वाटलं म्हणून म्हटलं.. नाहीतर मुलीच्या संसारात आम्ही कशाला लक्ष घालू?’’

‘‘हॅलो डॉक्टर काजरेकर का? मी मिसेस  बोलतेय. तुम्ही कौन्सिलिंग करता असं कळलं मला, म्हणून फोन केला.. माङया मुलीचा प्रॉब्लेम आहे हो. अजून सहा महिने पण झाले नाहीत लगAाला.. परत आलीय घरी.. काही धड बोलत नाही आमच्याशी.. नुसती घुम्यासारखी बसून राहते.. जायचंच नाही म्हणते परत.. मी खुप समजावलं. म्हटलं आपली पडती बाजू आहे. मुलीच्या जातीला अॅडजेस्ट करावं लागतं.. पण ऐकतच नाही.. मला फार टेन्शन आलंय डॉक्टर. कसं व्हायचं पोरीच्या संसाराचं? बरं, मी पडले मुलीची आई! पोरीच्या संसारात किती दखल देणार?... हॅलो, हॅलो डॉक्टर.. काय करू मी?’’

‘‘आई तुङयासाठी स्वेटर आणलंय’’
‘‘अरे वा! पण मावश्यांसाठी आणि मामीसाठी काही आणलं आहेस की नाही? नाही ते लोक प्रत्येक वेळी आपल्यासाठी काही-ना-काही आणतातच - म्हणून म्हटलं. नाही आणलस का? असू.दे.. खरं तर या व्यवहाराच्या गोष्टी घरातल्या मोठय़ा बाईने सांगाव्या सुनांना.. अनुभव नसतो ना तुम्हा मुलांना! असू दे आता..’’
- अॅड. सुशील अत्रे

Web Title: Girl world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.