मुलींनो सक्षम, जागृत व्हा, पोलीस प्रशासन तुमच्या पाठीशी -राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 03:56 PM2019-12-22T15:56:18+5:302019-12-22T16:09:39+5:30

मुलींनो सक्षम व्हा. जागृत व्हा. पोलीस प्रशासन तुमच्या पाठीशी आहे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी केले.

Girls, be aware, police administration is behind you | मुलींनो सक्षम, जागृत व्हा, पोलीस प्रशासन तुमच्या पाठीशी -राठोड

मुलींनो सक्षम, जागृत व्हा, पोलीस प्रशासन तुमच्या पाठीशी -राठोड

Next
ठळक मुद्दे भुसावळ शहरातील महाविद्यालयांमध्ये जनजागृतीअलिकडे ठिकठिकाणी महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे जनजागृतीस्वत:चे रक्षण स्वत: करण्यासाठी स्वयंसिद्धा यासारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचेकिंचितही मनात शंका आली तर संबंधित पोलीस ठाण्यात कॉल करापोलीस ठाण्याचे नंबर जवळ ठेवा. कोणत्याही प्रकारचा ताण व असुरक्षितता मनाशी लावून घेऊ नका

भुसावळ, जि.जळगाव : मुलींनो सक्षम व्हा. जागृत व्हा. पोलीस प्रशासन तुमच्या पाठीशी आहे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी शहरातील महाविद्यालयांमध्ये जनजागृतीप्रसंगी केले.
अलिकडे ठिकठिकाणी महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे जनजागृती करण्यात येत आहे. मुलींच्या मनातील भीती दूर करण्यासाठी, महिलांना विश्वासात घेत घाबरायचे काही कारण नाही. स्वत: जागृत व्हा. पोलीस प्रशासन तुमच्या पाठीशी आहे, असेही राठोड यांनी नाहाटा महाविद्यालयात पोलीस विभाग पिंकथोन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसिद्धा कार्यक्रमात उपस्थित तरुणींना मार्गदर्शन करताना सांगितले.
स्वत:चे रक्षण स्वत: करण्यासाठी स्वयंसिद्धा यासारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहे. सतर्क राहा. आपण ज्या भागात राहतो त्याची संपूर्ण माहिती ठेवा. पोलीस ठाण्याचे नंबर जवळ ठेवा. कोणत्याही प्रकारचा ताण व असुरक्षितता मनाशी लावून घेऊ नका. पोलीस हे आपल्या सेवेसाठी आहे किंबहुना ते आपले मित्रच आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवा. किंचितही मनात शंका आली तर संबंधित पोलीस ठाण्यात कॉल करा. आपण जागृत व्हा व इतरांनाही जागृत करा.
शहरातील महिला महाविद्यालय, संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय, साकेगाव येथील चैतन्य आयुर्वेद कॉलेज, दीपनगर येथील महाविद्यालय या ठिकाणी जाऊन विद्यार्थिनींमध्ये जनजागृती पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
याप्रसंगी नाहाटा कॉलेजचे चेअरमन मोहन फलक, प्राचार्या डॉ.मीनाक्षी वायकोळे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, निर्भया पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल विजय सपकाळे, पिंकथोनच्या माधुरी गुजर, खाजगी संस्थेच्या आरती चौधरी, कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Girls, be aware, police administration is behind you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.