यावल तालुक्यातील साकळी येथे केळी बाग लागवड करून साजरा केला मुलीचा वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 05:53 PM2018-12-12T17:53:49+5:302018-12-12T17:55:25+5:30

स्त्री जन्माचा स्वागत करणारा उपक्रम तालुक्यातील साकळी येथील शेतकरी मोहन बडगुजर यांनी कन्या चंद्रकांत हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्याच हाताने शेतात केळी पिकाची लागवड करून शुभारंभ केलेला आहे.

The girl's birthday was celebrated by planting of banana plant at Sakli in Yaval taluka | यावल तालुक्यातील साकळी येथे केळी बाग लागवड करून साजरा केला मुलीचा वाढदिवस

यावल तालुक्यातील साकळी येथे केळी बाग लागवड करून साजरा केला मुलीचा वाढदिवस

Next
ठळक मुद्देशेतकरी कन्येच्या वाढदिवसाचा अनोखा उपक्रमपरिसरात होतेय वाढदिवसाच्या कार्यक्रमाची चर्चा

यावल, जि.जळगाव : सध्या समाजामध्ये पुरुषप्रधान संस्कृतीचा जोर वाढलेला दिसून येत आहे. स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जात असतो. तथापि, शासनासह अनेक स्तरातून स्त्रीजन्माचा ‘सन्मान’ व्हावा असेही विविध माध्यमातून नेहमी सूचविले जाते. तरीही स्त्रियांना समान दर्जा मिळूनही कमी लेखले जाते. याउलट स्त्री जन्माचा स्वागत करणारा उपक्रम तालुक्यातील साकळी येथील शेतकरी मोहन बडगुजर यांनी कन्या चंद्रकांत हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्याच हाताने शेतात केळी पिकाची लागवड करून शुभारंभ केलेला आहे.
साकळी, ता.यावल येथील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते मोहन काशिनाथ बडगुजर यांनी आपल्या स्वत:च्या शेतात येत्या हंगामाकरिता केळी लावण्याचे नियोजन केलेले होते. त्यासाठी तब्बल साडेचार महिन्यांपासून टिश्यूची केळीची रोपे बुक केलेली होती.
दरम्यान, ठरलेल्या नियोजनानुसार १० रोजी मुलगी चंद्रकांता हिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याहस्ते शेतात केळीची पाच रोपे लावून केळी लागवडीचा शुभारंभ करुन वाढदिवस साजरा केला. या आगळ्या -वेगळ्या वाढदिवसाची गावासह परिसरात चर्चा आहे. याप्रसंगी चंद्रकांताची आई उज्वला बडगुजर, काका प्रेमराज बडगुजर, भाऊ गोटू व प्रणय बडगुजर या कुटुंंबियांसह संजय नाईक, वासू बडगुजर उपस्थित होते.

Web Title: The girl's birthday was celebrated by planting of banana plant at Sakli in Yaval taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.