ग्रामीण भागातील मुलांशी विवाहास मुलींचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:48 PM2019-11-18T22:48:30+5:302019-11-18T22:48:36+5:30

जळगाव : ग्रामीण भागातील मुलांशी विवाहास मुली नकार देत आहेत, त्यामुळे समाजात तरुणांच्या विवाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ...

 Girls' refusal to marry boys in rural areas | ग्रामीण भागातील मुलांशी विवाहास मुलींचा नकार

ग्रामीण भागातील मुलांशी विवाहास मुलींचा नकार

Next

जळगाव : ग्रामीण भागातील मुलांशी विवाहास मुली नकार देत आहेत, त्यामुळे समाजात तरुणांच्या विवाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर राज्य अग्रवाल महिला संमेलनतर्फे मंथन करण्यात आले.
अग्रनारी प्रांतीय महिला असोसिएशन संचालित राज्य अग्रवाल महिला संमेलनतर्फे अग्रवाल समाजातील जिल्हा आणि राज्यस्तरीय पातळीवरील महिलांचे प्रथमच जिल्हास्तरीय अधिवेशन आणि आमसभा रविवारी १७ रोजी एमआयडीसी येथील दादलिका फार्म येथे उत्साहात झाली.
उद्घाटन सकाळी उद्योजक संजय व सरिता दादलिका यांच्या हस्ते झाले. प्रारंभी अग्रसेन महाराज आणि माता माधवी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
व्यासपीठावर औरंगाबाद येथील प्रांत अध्यक्षा मालती गुप्ता, अकोला येथील प्रांतमंत्री उषा अग्रवाल, मीना अग्रवाल (धुळे), वीणा गर्ग, सपना अग्रवाल(नाशिक), सुमित्रा भारुका, खान्देश विभागीय अध्यक्षा मीनल अग्रवाल, प्रमिला दादलिका, जिल्हाध्यक्ष रेखा अग्रवाल, उपाध्यक्षा उर्मिला अग्रवाल यांची उपस्थिती होती. पाचोरा येथील श्वेता अग्रवाल यांचा सत्कार झाला. त्यांनी १४.८५ कि.मी. चा स्कार्प बनविल्याचा विक्रम गिनीज बुक आॅफ रिकॉडमध्ये नोंद झाला आहे. प्रास्तविक मीनल अग्रवान यांनी केले. सूत्रसंचालन दिप्ती अग्रवाल, सोनल गोयल तर आभार अंशु अग्रवाल यांनी मानले.

महिलांनी लघुउद्योग सुरु करावेत
दुपारच्या सत्रात आमसभा झाली. अग्रोहा धाम यात्रेची संपूण माहिती देण्यात आली. तसेच समाजातील विवाहेच्छूक मुली ग्रामीण भागात विवाहासाठी नकार देतात. त्यामुळे येथील युवकांचा विवाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर उपयायोजनेसाठी चर्चा करण्यात आली. महिलांनी लघु उद्योग सुरू करावेत यासाठी मार्गदर्शन राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी केले. तसेच सोशल मीडियावर ग्रुपमध्ये मेसेज टाकताना अनावश्यक संदेश टाकू नयेत, याबाबत एकमताने मंजुरी घेण्यात आली. त्यानंतर महिलांच्या सामाजिक प्रश्नावर मंथन झाले.

Web Title:  Girls' refusal to marry boys in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.