मुलींनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्ताराव्यात-डॉ.श्रीपाल सबनीस यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 03:42 PM2019-02-04T15:42:44+5:302019-02-04T15:44:13+5:30
मुलींनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्ताराव्यात, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले.
चाळीसगाव, जि.जळगाव : मुलींनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्ताराव्यात, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस यांनी केले.
पातोंडा, ता.चाळीसगाव येथील माध्यमिक विद्यालयात ‘शैक्षणिक गुणवत्ता सुधार व वाढ कार्यक्रम’ झाला. त्यात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्रा. टी. जी. पाटील होते.
प्रा.डॉ.सबसीन म्हणाले की, मुलांनी आपल्या बौद्धिक कौशल्य वाढीसाठी वेगवेगळ्या कसोट्यांचा प्रयोग केला पाहिजे. आपल्या ज्ञानाच्या कक्षा सतत वाढवल्या पाहिजेत. मुलांचा सहभाग घेत त्यांनी थोर व्यक्तींचा भारतासाठी काय योगदान आहे याविषयी माहिती दिली. संकल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत चव्हाण व डॉ.स्मिता चव्हाण यांच्या ग्रामीण व आदिवासी भागातील आतापर्यंतच्या कामाचे कौतुक केले.
मुख्याध्यापक चौधरी, माजी शिक्षक आर. एम. चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत केले. क्रीडा शिक्षक तुषार निकम व शिक्षक उपस्थित होते.
बोरखेडे गावातील क्रीडापटू प्रांजली पाटील, पूजा पाटील व नेहा चव्हाण यांच्या वेगवेगळ्या खेळातील राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल सबनीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन पूजा चव्हाण यांनी, अभय पाटील यांनी यांनी आभार मानले.