गिरणा धरण ७३ टक्क्यांच्या पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:34 PM2019-08-13T12:34:23+5:302019-08-13T12:36:19+5:30
जिल्ह्यातील धरणे ५१ टक्के भरली
Next
जळगाव जिल्ह्यातील धरण परिसरात गेल्या काही दिवासांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली असून जिल्ह्यातील धरणे ५१ टक्के भरली आहेत. यामध्ये गिरणा धरणाचा साठा ७३.६४ टक्क्यांवर पोहचला आहे. सोबतच वाघूर धरण ३९.६३ टक्के तर हतनूर धरण १९ टक्के भरले आहे.
हतनूर धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून प्रती सेकंद ३४ हजार ४१४ क्यूसेस वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.