‘गिरणा’च्या आवर्तनाला यंदा कात्री लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 04:42 PM2017-10-14T16:42:59+5:302017-10-14T16:47:00+5:30
कमी पावसाचा परिणाम : आमदारांच्या उपोषणानंतरही पाणी सोडण्याची चिन्हे नाहीत
जळगाव : गिरणा धरणात यंदा समाधानकारक पाणीसाठा असला तरी जिल्'ातील टंचाईच्या परिस्थितीमुळे पिण्यासाठीचे आरक्षण वाढणार असून जेमतेम दोन आवर्तने रब्बी व त्यानंतर उन्हाळी पिकांना दिले जाण्याचे संकेत आहेत. यावर्षी जिल्'ात जेमतेम ७० टक्के पाऊस झाला. काही तालुक्यात सरासरी ५० ते ६० टक्क्याच्या जवळपास पाऊस झाला. त्यामुळे यंदा टंचाईच्या झळा लवकर बसण्याची शक्यता आहे. आमदारांच्या उपोषणानंतरही अद्याप पाणी नाही पारोळा-एरंडोल विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी गिरणाचे पाणी पारोळा व एरंडोल तालुक्यातील टंचाईच्या गावांना मिळावे म्हणून अनेर व बोरी प्रकल्पात पाणी सोडावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे आले होते. त्यांनी १५ आॅक्टोबरनंतर पाणी सोडणार असे आश्वासन दिले होते. मात्र १४ आॅक्टोबर उजाडला तरी अद्याप पाणी सोडण्याबाबतचे अद्यापही निर्देश नाहीत. पाणीवाटप समिती बैठक१६आॅक्टोबरलाहोणारका? जलसंपदामंत्री गिरीशमहाजन यांनीडॉ.सतीशपाटीलयांचेउपोषणसोडल्यानंतरतेम्हणालेहोतेकी, शासन निर्णयानुसार १५ आॅक्टोबरपर्यंत अधिकृत पावसाळा असल्याने त्यापूर्वी टंचाई घोषीत करता येत नाही. त्यामुळेच १६ आॅक्टोबरला पाणीवाटप समितीची व त्यानंतर कालवा सल्लागार समितीची बैठक होईल. या समितीसमोर पारोळा शहर व तालुक्यातील स्थिती मांडण्यातयेईल.मात्रअद्यापहीपाणीवाटपसमितीचीबैठकआयोजितकेलेलीनाही. जेमतेम दोन आवर्तने शक्य जिल्'ातील यंदाची टंचाईची स्थिती लक्षात घेता यावर्षी जेमतेम दोन वेळा गिरणाधरणावरून आवर्तन दिले जाण्याची शक्यता आहे. शेवटी शेवटी एक आवर्तन हे पिण्याच्या पाण्यासाठी दिले जाईल. आरक्षणाबाबत पालकमंत्र्यांच्या बैठकहोईल.त्यात हे ठरेल. गिरणा धरण ठरणार वरदान गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा बºयापैकी पाऊस झाला. त्यामुळे हे धरण आतापर्यंत जवळपास ८० टक्के भरलेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा दहा टक्क्याने कमी असला तरी सध्याच्या पाणी साठ्यातून अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. धरणावर ६९ हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून या प्रकल्पावर जिल्'ातील चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, पारोळा व जळगाव तालक्यातील तसेच याच नदी लगतच्या पांझणनदीवर मालेगाव, चाळीसगाव, भडगाव व धुळे असे सर्व मिळून ६९ हजार ३५१ हेक्टर सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. रब्बी व उन्हाळी पिकांना या धरणावरून पाणी मिळत असते. त्यामुळे नदीवरील पाणी आरक्षणाबाबत नेहमीच उत्सुकता असते.