जिल्हा बॅँक प्रकरणात सुस्पष्ट शपथपत्र द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:36 PM2019-03-30T12:36:29+5:302019-03-30T12:36:50+5:30

खंडपीठाचे आदेश : तपासी अधिकाऱ्यांवर ताशेरे

Give an affidavit in the District Bank case | जिल्हा बॅँक प्रकरणात सुस्पष्ट शपथपत्र द्या

जिल्हा बॅँक प्रकरणात सुस्पष्ट शपथपत्र द्या

googlenewsNext


जळगाव : विशेष लेखा परीक्षकांच्या अहवालावरून जिल्हा बँकेत ४०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद माजी नगरसेवक नरेंद्र भास्करराव पाटील यांनी २०१२ मध्ये जिल्हापेठ पोलिसात दिली होती. या प्रकरणी दाखल गुन्हयात आतापर्यंत नुकसानीच्या रकमेच्या वसूलीसाठी काय कार्यवाही केली? याबाबत माहिती देणारे सुस्पष्ट प्रतिज्ञापत्र ५ एप्रिलपूर्वी सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी.व्ही. नलावडे व न्यायाधीश मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने दिले आहेत. मालमत्ता जप्त झाल्या काय? अशी विचारणा करून तपासात काहीही प्रगती नसल्याबाबत तपास यंत्रणेवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
४०० कोटींचे बॅँकेचे नुकसान
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सन २०१२ मध्ये झालेल्या विशेष लेखापरिक्षणात बॅँकेत ४०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचे आढळून आले होते. बॅँकेच्या काही सवलतीच्या योजनांमुळे हे नुकसान झाल्याचे विशेष लेखा परिक्षणातून समोर आले होते.
पोलिसात तक्रार
याबाबतचा अहवाल लेखा परिक्षकाने दिल्यानंतर माजी नगरसेवक नरेंद्र भास्करराव पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती़ त्यानुसार ४०० कोटी रूपयांमध्ये बँकेचे नुकसान झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा काही काळ तपास चालला, त्यानंतर तपास संथगतीने सुरू होता़ त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात पोहोचले व त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणावर कामकाज सुरू आहे.
मालमत्तांचा तपास घेणे आवश्यक
अशा प्रकारच्या आर्थिक व्यवहारातील पैसा हा अधिकतर मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला जात असतो़ त्यामुळे या प्रकरणातील तपासी अधिकारी यांनी अशा मालमत्तांचा शोध घेणे तसेच त्या जप्त करणे आवश्यक होते. त्याबाबत तपासी अधिकारी यांनी आतापर्यंत या मालमत्तांचा शोध घेतला का? तसेच त्याबाबत काय कार्यवाही केली? मालमत्ता जप्त केल्या गेल्यात काय? अशी विचारणा करून ५ एप्रिलपूर्वी स्पष्ट अभिप्राय असलेले शपथ पत्र न्यायालयात दाखल करावे, असे आदेश न्यायाधीश टी़व्ही़ नलवाडे व न्या़ मंगेश़ एस़ पाटील यांनी दिले आहेत.
तपासी अधिकाऱ्यांना फटकारले
जिल्हा बँकेचे ४०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्या प्रकरणात संबंधित तपासणी अधिकाºयाकडून तपासात प्रगती झाली नाही़ त्यामुळे तपासी अधिकाऱ्यांना न्यायालयाने फटकारले आहे. या प्रकरणाचा योग्यरित्या व योग्य दिशेने तपास करण्याच्या सुचना देखील न्यायालयाने दिल्या आहे़
गुन्ह्याच्या तपासात प्रगती नाही
बँकेचे नुकसान केल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी २७ मार्च रोजी आदेश दिले आहेत. या आदेशात तपासी अधिकाºयांवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. या गुन्ह्यातील तपासात प्रगतीच झालेली नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे़ त्यामुळे योग्य दिशेने तपास व्हावा, अशा सुचना न्यायालयाने तपासी अधिकाºयांना केल्या आहेत़

Web Title: Give an affidavit in the District Bank case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.