पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांना महापौर, उपमहापौरपदी संधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:44 AM2021-02-20T04:44:28+5:302021-02-20T04:44:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भाजपच्या काही नगरसेवकांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांची शुक्रवारी भेट घेऊन पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांनाच ...

Give a chance to those who are loyal to the party as mayor, deputy mayor | पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांना महापौर, उपमहापौरपदी संधी द्या

पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांना महापौर, उपमहापौरपदी संधी द्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भाजपच्या काही नगरसेवकांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांची शुक्रवारी भेट घेऊन पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांनाच महापौर व उपमहापौरपदी संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच बाहेरून पक्षात आलेले तसेच पक्षांच्या आंदोलनात संघटनेचे काम करत नसलेल्यांना संधी देऊ नये, अशी मागणीदेखील नगरसेवकांनी केली आहे.

महापौर व उपमहापौरपदासाठी भाजपत रस्सीखेच निर्माण झाली आहे. निवड प्रक्रियेला अजून एक महिन्याचा अवधी आहे. मात्र, त्याआधीच सत्ताधारी भाजपमधील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपत महापौरपदावरून चार गट निर्माण झाले आहेत. शिवाजीनगर, कांचन नगर, शनिपेठ, भागातील नगसेवकांचा एक गट, भाजपतील एकनिष्ठ असलेल्या नगरसेवकांचा दुसरा, पिंप्राळा परिसरातील तिसरा तर इतर मिळून चौथा असे चार गट सद्या भाजपत निर्माण झाले आहेत. या चारही गटांकडून पक्षनेतृत्वाकडे महापौर व उपमहापौरपदासाठी दबाव निर्माण केला जात आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त माजी मंत्री गिरीश महाजन शहरात आले असता, यावेळी नवनाथ दारकुंडे, ॲड. दिलीप पोकळे, भरत कोळी, कुलभूषण पाटील, चेतन सनकत या नगरसेवकांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महाजन यांची भेट घेतली व महापौरपदासाठी पक्षाला व जनतेला वेळ देणाऱ्याला संधी देण्याची मागणी केली आहे.

गिरीश महाजनांनी मारून नेली वेळ

शिवजयंतीचा कार्यक्रम संपल्यानंतरच नगरसेवकांनी महाजनांकडे गऱ्हाणी मांडायला सुरुवात केल्यानंतर महाजन यांनी याबाबत सविस्तर चर्चा करावी लागणार असल्याचे सांगत वेळ मारून नेली. महापौर-उपमहापौरांच्या नावांबाबत महाजनांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी ११ वाजता नगरसेवकांची बैठक होणार असल्याची माहिती आता नगरसेवकांनी दिली आहे. या बैठकीत नगरसेवक आपली बाजू मांडणार आहेत.

आमदार भोळेंकडून आलेल्या नावांनाच विरोध

महापौरपदासाठी आमदार सुरेश भोळे यांनी प्रतिभा कापसे यांचे नाव महापौरपदासाठी तर उपमहापौरपदासाठी सुरेश सोनवणे यांच्यासाठी आग्रह केला आहे. मात्र, या दोन्ही नावांना सत्ताधारी भाजपतील १५ ते २० नगरसेवकांकडून विरोध होत आहे. तर काही नगरसेवक भारती सोनवणे यांना पुन्हा संधी देण्याची मागणी करत आहेत. तर काही नगरसेवक ज्योती चव्हाण, दीपमाला काळे व उज्ज्वला बेंडाळे यांच्या नावासाठी आग्रही आहेत. त्यातच उपमहापौरपदासाठी देखील दररोज एक नवे नाव वाढू लागले आहे. यामध्ये भगत बालाणी, डॉ. चंद्रशेखर पाटील व चेतन सनकत यांचे नावदेखील आघाडीवर आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या बैठकीत गिरीश महाजन व जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Give a chance to those who are loyal to the party as mayor, deputy mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.