जामनेरात पंचनामे करून तातडीने मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:24 AM2021-09-10T04:24:16+5:302021-09-10T04:24:16+5:30
जळगाव : जामनेरात अतिवृष्टीमुळे शेती व घरांचे अतोनात नुकसान झालेले आहे. अशा स्थितीत तातडीने तालुक्यात पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत ...
जळगाव : जामनेरात अतिवृष्टीमुळे शेती व घरांचे अतोनात नुकसान झालेले आहे. अशा स्थितीत तातडीने तालुक्यात पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत करावी, अशी मागणी जामनेर काँग्रेसकडून करण्यात आली आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले आहे.
या अतिवृष्टीत पिके पूर्णत: उदध्वस्त झालेली आहे. अनेकांच्या डोक्यावरील छत गेले असून त्यांचे राहण्याचीही अडचण आहे. पशुधनाचे मोठे नुकसान झालेले आहे. ओझर, हिंगणे, टाकरखेडा, सामरोद, वाडीकिल्ला, नागण चौकी, टाकळी, तळेगाव, तोंडापूर, मोयखेडा दिगर, लहासर, बेटावद आदी ठिकाणचे पंचनामे करण्याच्या सूचना स्थानिक पातळीवर देण्याची मागणी केली आहे. निवदेनावर काँग्रेसचे कार्याध्यक्ष शंकर राजपूत, कैलाश महाजन, राजेंद्र नाईक, जगदीश गाढ़े, गोकुळ चव्हाण, कल्पना पाटील, नासिर बागवान, जगदेव बोरसे, सोनुसिंग पहेलवान, शुभम परमार, ईश्वर रोकडे, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील, जामनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष दीपक राजपूत आदी उपस्थित होते.