वाढीव मदत द्या, अन्यथा तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 10:03 PM2019-11-26T22:03:43+5:302019-11-26T22:03:56+5:30

जळगाव : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ २५ हजार रूपये प्रति हेक्टरप्रमाणे मदत द्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा ...

Give increased support, otherwise intense agitation | वाढीव मदत द्या, अन्यथा तीव्र आंदोलन

वाढीव मदत द्या, अन्यथा तीव्र आंदोलन

Next

जळगाव : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ २५ हजार रूपये प्रति हेक्टरप्रमाणे मदत द्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला. शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शिवसेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावर शिवसेनेतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हेक्टरी आठ हजार रूपयांची मदत जाहीर करून सरकारने शेतकºयांची थट्टा केल्याचा आरोप तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी यावेळी केला़
मोर्चामध्ये जळगाव शहर संपर्क प्रमूख समाधान पाटील, ग्रामीण संपर्क प्रमूख अरविंद नाईक मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर विष्णू भंगाळ,े जि. प. सदस्य प्रताप पाटील, पं.स. सदस्य जनार्दन पाटील युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, उप महानगर प्रमुख मानसिंग सोनवणे, गणेश गायकवाड, अंकुश कोळी, युवा सेना समन्वयक जितू बारी, महिला आघाडी महानगरप्रमुख शोभा चौधरी, शहर प्रमूख ज्योती शिवदे, निलेश पाटील, निलेश वाघ, समाधान पाटील, नंदू पाटील, प्रमोद सोनवणे, रवींद्र चव्हाण, सचिन चौधरी, दगडू चौधरी, विशाल वाणी बाला लाठी, विशाल निकम, स्वामी पाटील आदी उपस्थित होते. तहसीलदार वैशाली हिंंगे यांना निवेदन देण्यात आले़ वरिष्ठ पातळीवर मागणी कळविली जाईल, असे आश्वासन तहसीलदार हिंगे यांनी यावेळी दिले़

या आहेत मागण्या...
पीक विम्याचे पैसे तातडीने शेतकºयांच्या खात्यावर जमा व्हावेत, सरसकट कर्जमाफी व्हावी, केंद्रीय पथकाची पाहणी समाधानकारक नसून त्याची फेरविचारणा व्हावा, शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत मिळावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या़ मोर्चामध्ये विविध घोषणा देण्यात आल्या़

Web Title: Give increased support, otherwise intense agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.