सात दिवसाच्या आत शेतकºयांना विमाची रक्कम द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 09:52 PM2017-10-03T21:52:54+5:302017-10-03T21:53:49+5:30
जिल्ह्यातील केळी फळ पीक विमाअंतर्र्गत नुकसान भरपाईस पात्र ठरलेल्या शेतकºयांना नुकसान भरपाईची रक्कम सात दिवसाच्या आत देण्याचा सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी संबधित विमा कंपनीला दिल्या आहेत.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.३-जिल्ह्यातील केळी फळ पीक विमाअंतर्र्गत नुकसान भरपाईस पात्र ठरलेल्या शेतकºयांना नुकसान भरपाईची रक्कम सात दिवसाच्या आत देण्याचा सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी संबधित विमा कंपनीला दिल्या आहेत.
मंगळवारी रात्री ७.३० वाजता जिल्हाधिकाºयांचा दालनात शेतकरी व विमा कंपनीच्या अधिकाºयांसोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी या सूचना दिल्या आहेत. बैठकीला जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे, बजाज अलियान्स कंपनीचे पुष्पेंद्र प्रताप सिंह, जिल्हा बॅँकेचे अधिकारी, भोकर सर्र्कलमधील शेतकरी डॉ.सत्वशिल जाधव, अनिल सपकाळे, किरण सांळुखे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
विमा कालावधीची मुदत संपल्यावरही नुकसान भरपाई नाही
शेतकºयांकडून डॉ.सत्वशिल जाधव यांनी सांगितले की, भोकर परिसरातील कठोरा, गाढोदा, किनोद व करंज या गावांमध्ये एप्रिल महिन्यात आलेल्या वादळात केळीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या संदर्भात विमा कंपनीला ४८ तासाच्या आता कळवून, कंपनीने पंचनामे केले आहेत. तसेच केळी पीक विमा अंतर्गत जिल्ह्यात १ हजार ८०० शेतकºयांनी अर्ज केले होते. मात्र नुकसान भरपाईसाठी ८०० शेतकरीच पात्र ठरले आहे. त्यातच ३१ जुलै रोजी विमा कालावधी संपल्यावर तीन महिने उलटून देखील नुकसान भरपाई मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
अपात्र ठरविलेल्याबाबत कारणे द्या-जिल्हाधिकारी
जिल्हाधिकाºयांनी संबधित विमा कंपनीच्या अधिकाºयांना १ हजार ८०० शेतकºयांनी अर्ज केल्यावर १ हजार शेतकरी का अपात्र ठरले आहेत ? याबाबतची कारणे व पात्र ठरलेल्या नुुकसानग्रस्त शेतकºयांची रक्कम सात दिवसाच्या आत देण्याचा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. मात्र सात दिवसात नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्यास विमा कंपनीविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.