Jalgaon: पदे मिरवण्यापेक्षा पदाला न्याय द्या, ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 10:46 PM2023-03-27T22:46:00+5:302023-03-27T22:47:28+5:30
Jayant Patil: गाफील न राहता पक्षाचा प्रचारक म्हणून काम करा, नुसती पदे मिरवण्यापेक्षा पदाला न्याय द्या, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.
पारोळा, जि. जळगाव : गाफील न राहता पक्षाचा प्रचारक म्हणून काम करा, नुसती पदे मिरवण्यापेक्षा पदाला न्याय द्या, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.
प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सोमवारी पारोळा, भुसावळ आणि जामनेर येथे पक्षाच्या आढावा बैठका घेतल्या. वाढती महागाई, वाढलेली हुकूमशाही व जनतेच्या दुखावल्या जात असलेल्या भावना याचा फायदा घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रत्येक तालुक्यातून पक्षाच्या कामाचा अहवाल घेण्यात आला. संघटनात्मक बांधणी काय करण्यात आलेली आहे, कोणी बुथनुसार काय काम केले, सदस्य नोंदणी अभियानात कोणी काय काम केले, याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांनी घेतला आणि संघटनात्मक बांधणीवर कार्यकर्त्यांकडून माहिती जाणून घेतली. बैठकीत माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार एकनाथ खडसे, माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.