मधुकर साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी १६ संचालकांचे चेअरमनकडे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 12:34 AM2020-08-21T00:34:33+5:302020-08-21T00:35:19+5:30

मधुकर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी ठोस पावले उचलावी व शेतकरी, कामगार, ऊस तोडकरी, सेवानिवृत्त कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा व रावेर-यावल तालुक्याचा मानबिंदू असलेला ‘मधुकर’ सुरू करावा.

To give Madhukar Sugar Factory on lease to 16 Directors | मधुकर साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी १६ संचालकांचे चेअरमनकडे साकडे

मधुकर साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी १६ संचालकांचे चेअरमनकडे साकडे

Next
ठळक मुद्देत्वरित हालचाली न केल्यास होणाऱ्या परिणामांना चेअरमन राहणार जबाबदारचेअरमन म्हणताण, काही संचालकांचे निवेदन चुकीचे

वासुदेव सरोदे
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : मधुकर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी ठोस पावले उचलावी व शेतकरी, कामगार, ऊस तोडकरी, सेवानिवृत्त कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा व रावेर-यावल तालुक्याचा मानबिंदू असलेला ‘मधुकर’ सुरू करावा. तसे न केल्यास होणाºया परिणामांना आपण स्वत: जबाबदार असल्याचे निवेदन ‘मधुकर’च्या संचालकांनी चेअरमन शरद महाजन यांना दिले आहे. यामुळे कारखाना क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. ‘मधुकर’ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अडकला आह.े त्यामुळेच सन २०१९-२०चा हंगाम सुरू होऊ शकला नाही. २०१४ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासदांनी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी व माजी चेअरमन दिगंबर नारखेडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला विश्वासाने निवडून दिले होते. मात्र आज परिस्थिती विपरित आहे.
नोव्हेंबर २०१९च्या सभेत कारखाना भाडेतत्वावर देण्यासंबंधी निर्णय झाला होता व त्याला आजी माजी संचालक, लोकप्रतिनिधी यांनी संमती दिली होती व त्यानंतर वार्षिक सभा बोलवावी, असा निर्णयही झाला होता. मात्र त्यानंतर कोणतीच कार्यवाही झाली नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.
कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा घेता येणार नाही, असे चेअरमन म्हणून आपण सांगितले. मात्र लॉकडाऊनच्या आधी आपण काहीच न केल्याचाही आरोप या संचालकांनी चेअरमन यांच्यावर केला आहे. या सर्व संचालकांनी निवेदनात शेतकरी, कामगार यांनी वेळोवेळी आपले गाºहाणे आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे मांडले. त्यावर आमदार चौधरी यांनी आपणास संवाद साधून कर्तव्याची व जबाबदारी जाणीव करून दिली. त्यानंतर चेअरमन म्हणून आपण कुठलीही हालचाल न करता नकारात्मक भूमिका घेत असल्याने कारखान्यावर अवलंबून असलेल्या घटकांचे नुकसान होत असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आपण संचालकांची बैठक घेऊन जुनेच मुद्दे पुढे केले. चेअरमन म्हणून आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे जाऊन प्रश्न सोडवण्याचे सौजन्यही दाखवले नाही. त्यामुळे चेअरमन म्हणून आपण गांभीर्याने लक्ष न देता वेळकाढूपणा करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर संचालक नितीन चौधरी, लीलाधर चौधरी, संजीव महाजन, मिलिंद नेहते, प्रशांत पाटील, निर्मला महाजन, अनिल महाजन, शालिनी महाजन, रमेश महाजन, शैला चौधरी, भागवत पाचपोळ, नथू तडवी, संजय पाटील, बारसू नेहते, कामगार प्रतिनिधी किरण चौधरी यांच्या स्वाक्षºया आहेत.

काही संचालकांचे निवेदन चुकीचे
संचालक मंडळांच्या वेळोवेळी सर्व विषय मांडण्यात आले आहे. कारखाना हितासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काही संचालकांनी दिलेले निवेदन चुकीचे आहे. आमदार शिरीष चौधरी यांना कारखाना हितासाठी मी नेहमी फोन करत असतो आणि पुढेही कारखाना सुरळीत व्हावा यासाठी आमदार चौधरी यांचे प्रयत्न असणारच आहे. कारखाना हितासाठी मी कधीही राजकारण केले नाही. भविष्यातदेखील करणार नाही. कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासंबंधी सर्वसाधारण सभेची मंजुरी घ्यावी लागते तरच पुढील विषय मार्गी लागतात. यासंदर्भात साखर आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करून सभेची परवानगी मागितली आहे. हे सर्व विषय संचालक मंडळा समोर ठेवलेले आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच कारखाना भाडेतत्त्वावर देण्यात येईल.
-शरद महाजन, चेअरमन, मधुकर सहकारी कारखाना, फैजपूर

प्रक्रिया सुरळीत करावी
कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे जनरल मिटिंगच्या अडचणी येत आहेत. त्यावर याआधीच आजी-माजी संचालक, लोकप्रतिनिधी यांनी यापूर्वी संमती दिलेली आहे. त्यांचे पत्र व विद्यमान आमदार यांना भेटून विशेष बाब म्हणून भाडेतत्त्वावर कारखाना देण्यास मान्यता मिळविण्याची प्रक्रिया सुरळीत करावी व त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ घेऊन जावे.
-नितीन व्यंकट, संचालक, मधुकर सहकारी साखर कारखाना.

Web Title: To give Madhukar Sugar Factory on lease to 16 Directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.