जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना एकरी १ लाख भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 03:47 PM2018-10-02T15:47:54+5:302018-10-02T15:50:38+5:30

केळी पिकास मध्य प्रदेश सरकारने घोषित केल्याप्रमाणे प्रती हेक्टर १ लाख रुपये मिळावे व वीज बिल संपूर्ण माफ करावे, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोमवारी देण्यात आले.

Give one million compensation to banana growers in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना एकरी १ लाख भरपाई द्या

जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना एकरी १ लाख भरपाई द्या

Next
ठळक मुद्देविविध मागण्यांचे पालकमंत्र्यांना दिले निवेदनराष्ट्रवादी काँग्रेसने केली मागणीबोंडअळीच्या नुकसान भरपाईचे पैसे खात्यावर पडून असल्याचा आरोप

जळगाव : केळी पिकास मध्य प्रदेश सरकारने घोषित केल्याप्रमाणे प्रती हेक्टर १ लाख रुपये मिळावे व वीज बिल संपूर्ण माफ करावे, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सोमवारी देण्यात आले.
पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यासाठी बोंडअळीचे भरपाई अनुदान शासनाकडून प्राप्त झाले आहे मात्र अनेक तालुक्यात याचे पैसे तहसीलदारांच्या खात्यात पडून आहेत. हा पैसा शेतकºयांना त्वरित दिला जावा. केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले असल्याने केळी उत्पादकांना एकरी १ लाख मिळावे व त्यांचे वीज बिल माफ करावे, वीज पंपाच्या वीज दरातील वाढ मागे घ्यावी, जिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त करावेत, शेतकºयांना पिक विम्याची रक्कम त्वरित मिळावी, पाऊन न झाल्याने जिल्ह्यातील तालुक्यात ५० पैशांच्या आत पैसेवारी लावण्यात यावी, पाऊस न झाल्याने पाणी टंचाई भासणार आहे. त्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली. सोपान पाटील, अरविंद मानकरी, सुदाम पाटील, रमेश पाटील, नामदेव चौधरी, राजेंद्र पाटील, जामनेर तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, रवींद्र पाटील (भुसावळ), जि.प. गटनेते शशिकांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरातील अनेक नागरिक उपस्थित होते. त्यांनी विविध समस्यांबाबत पालकमंत्र्यांना निवेदन सादर केले.

Web Title: Give one million compensation to banana growers in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.