मुक्ताईनगरात खडसे गटाला दे धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:18 AM2021-05-27T04:18:38+5:302021-05-27T04:18:38+5:30

मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश : आणखी चार जण वेटिंगवर मुक्ताईनगर, जि. जळगाव : मुक्ताईनगरातील एकनाथ खडसे यांच्या गटाला ...

Give push to Khadse group in Muktainagar | मुक्ताईनगरात खडसे गटाला दे धक्का

मुक्ताईनगरात खडसे गटाला दे धक्का

Next

मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश : आणखी चार जण वेटिंगवर

मुक्ताईनगर, जि. जळगाव : मुक्ताईनगरातील एकनाथ खडसे यांच्या गटाला बुधवारी जोरदार धक्का बसला. त्यांचे समर्थक असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीमधील भाजपच्या सहा नगरसेवकांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आणखी चार नगरसेवक वेटिंगवर असल्याची माहिती मिळाली.

मातोश्री बंगल्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी बुधवारी दुपारी या नगरसेवकांचे शिवबंधन बांधून स्वागत केले. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. या घडामोडीमुळे आता जळगाव मनपापाठोपाठ मुक्ताईनगर नगरपंचायतमध्येही शिवसेनेचा भगवा फडकणार आहे.

चौकट

शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये भाजपा गटनेते पीयूष महाजन, उपगटनेते संतोष कोळी, माजी सभापती मुकेश वानखेडे, बिल्किसबी अमानुल्ला खान, शबाना बी अब्दुल आरिफ, नुसरतबी मेहबूब खान यांचा समावेश आहे. या तीन नगरसेविकांचे पती मुंबईत पवेश सोहळयास उपस्थित होते.

१७ पैकी भाजपचे होते १३ नगरसेवक

मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे सन २०१८ मध्ये नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले. यानंतर झालेल्या निवडणुकीत १७ पैकी १३ नगरसेवक हे भाजपाचे अर्थातच एकनाथ खडसे गटाचे निवडून आले होते. एका अपक्ष उमेदवाराने खडसे गटाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे खडसे गटाकडे १४ नगरसेवक झाले होते. शिवसेनेचे तीन नगरसेवक निवडून आले होते. हे नगरसेवक हे भाजपाचे असले तरी खडसे समर्थकच होते.

नगरसेविकांनी मुक्ताईनगरात

बांधले शिवबंधन

दरम्यान, आरिफ आझाद, नुरमोहम्मद खान, युनूस मेहेबूब खान या नगरसेविका पतींनी मुंबई येथे हातात शिवबंधन बांधले. यानंतर बिल्कीसबी खान, शबानाबी आरिफ, नुसरतबी खान या तीन नगरसेविकांनी मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. तिथे या महिला नगरसेविकांनी आमदार पाटील यांच्या पत्नी यामिनी पाटील यांच्याहस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

कोट

दहा नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाची बातमी ही दिशाभूल करणारी आहे. आता या क्षणाला नगराध्यक्षांसह माझ्याकडे नऊ नगरसेवक उपस्थित आहेत. तसेच जे सहा नगरसेवक दाखवले जात आहे त्यापैकी एक नगरसेविका अपात्र झालेल्या आहेत. उर्वरित नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, या भीतीपोटी त्यांनी हा प्रवेश केलेला आहे.

- एकनाथ खडसे, नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस,

कोट

महाविकास आघाडी सरकारच्या गतिमान कार्यावर विश्वास ठेवून काही नगरसेवकांनी आपली भेट घेतली व शिवसेना पक्ष प्रवेश करण्यासंदर्भात विनंती केली होती. मंत्री एकनाथ शिंदे व गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन हा विषय आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविला. यातून हा प्रवेश झाला आहे.

- चंद्रकांत पाटील, आमदार, मुक्ताईनगर.

Web Title: Give push to Khadse group in Muktainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.