हक्काचा निवारा द्या, मगच घरकुलाबाहेर काढा

By admin | Published: March 18, 2017 12:21 AM2017-03-18T00:21:30+5:302017-03-18T00:21:30+5:30

गोरगरिबांच्या संतप्त भावना : पालिकेत घरकूलप्रश्नी बैठक, निर्णयाचा चेंडू नागरिकांच्या हातात

Give the shelter of the right, then only take out the house | हक्काचा निवारा द्या, मगच घरकुलाबाहेर काढा

हक्काचा निवारा द्या, मगच घरकुलाबाहेर काढा

Next

भुसावळ : पालिकेच्या घरकुलातून बाहेर काढण्यापूर्वी हक्काचा निवारा द्या; मगच बाहेर काढा, असा संतप्त इशारा देत महिलांसह नागरिकांनी  प्रशासन व सत्ताधा:यांपुढे व्यथा मांडल्या़ गेल्या 15 वर्षापासून धूळखात असलेल्या घरकुलाकडे कुणाचेही लक्ष नसताना गरीब रहायला आल्यानंतरच प्रशासनाचा पोटशूळ का? असा अंतमरुख करणारा सवाल उपस्थित करतानाच धनदांडग्यांचे अतिक्रमण काढण्याचे सर्वोच्च न्यायालयासह खंडपीठाचे आदेश असताना त्याची अंमलबजावणी होत नाही मात्र दुसरीकडे गोरगरिबांचे छत डोक्यावरून काढण्याचा प्रयत्न होत असल्याच्या कृतीबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला़
सव्र्हे क्रमांक 297 वर उभारण्यात आलेल्या घरकुलांचा नागरिकांनी अनधिकृतरित्या ताबा मिळवल्यानंतर प्रशासन व नागरिकांमध्ये पेच निर्माण झाला आह़े कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी संबंधिताच्या भूमिका जाणून घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी चार वाजता पालिका सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आल़े तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत कुठलेही फलित निघाले नाही, मात्र निर्णय काय घ्यायचा आहे तो तुम्हीच घ्या, असे सांगून संबंधितांकडे निर्णयाचा चेंडू टोलवण्यात आला़
व्यासपीठावर नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याधिकारी बी़टी़ बाविस्कर, गटनेता मुन्ना तेली, किरण कोलते, पुरुषोत्तम नारखेडे, वसंत पाटील, रवींद्र खरात, प्रा.दिनेश राठी, जगन सोनवणे, अॅड़ बोधराज चौधरी, मुकेश गुंजाळ, दुर्गेश ठाकूर, निक्की बत्रा, देवेंद्र वाणी, महेंद्रसिंग ठाकूर आदींची उपस्थिती होती़ याप्रसंगी मुन्ना सोनवणे म्हणाले की, ज्यांनी तुम्हाला निवडून दिले किमान त्यांना सहकार्य करा़ अनेक दिवसांपासून घरकुलाचा गोंधळ सुरू आह़े बाजारपेठचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे व सहका:यांनी प्रसंगी चोख बंदोबस्त राखला़
धनदांडग्यांचे अतिक्रमण तोडा, मगच गरिबांना बाहेर काढा
4उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही जनता गॅलरीचे सुभाष नरगुणकर, गुरुदीप व जुड डिसुजा यांचे अतिक्रमण मुख्याधिकारी का तोडत नाही? असा संतप्त सवाल माजी नगरसेवक जगन सोनवणे यांनी उपस्थित केला़ उपस्थित सभागृहात त्यांनी न्यायालयीन निर्णयाची प्रतही दाखवली़ आधी धनदांडग्यांचे अतिक्रमण तोडा मगच गरिबांना घराबाहेर काढा, अशी भूमिका त्यांनी मांडली़ गरिबांना घरकूल मिळाले नाही तर उद्यापासून तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला़
मग तहसीलदारांविरुद्धच गुन्हा दाखल करायचा का ?
4गोरगरिबांना पालिकेच्या घरकुलात राहू देण्यासाठी तहसीलदारांनी आदेश दिले होते, मात्र आपल्याला तहसीलदारांचे आदेश मान्य नाहीत, अशी भूमिका मुख्याधिका:यांनी मांडल्यानंतर नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी संतप्त भावना व्यक्त करीत मग तहसीलदारांवर गुन्हा दाखल करायचा का?असा प्रश्न केला़
सांगा, आम्ही रहायचे कुठे
4भांडे घासून हातावर पोट भरतो, रहायला घर नाही, घरकुलातूनही बाहेर काढल्यास आम्ही रहायचे कुठे!
-राजकुमार ठाकूर/बिजानबी शेख खाटीक
15 वर्षापासून घरकूल पडून
4तब्बल 15 वर्षापासन घरकूल पडून असताना पालिकेने कुठलीही दखल घेतली नाही़ गरीब आहोत, कुठलीही नोकरी नाही, हातमजुरीवर पोट भरतो़ घरकुलात आल्याने मेंटेनन्स होत आह़े
-वैशाली कर्डे
वडिलांना पॅरालिसीस, बहीण अपंग
4वडिलांना पॅरालिसीस झाला आहे, बहीण अपंग आह़े अशा परिस्थितीत आम्ही जायचे कुठे? आधी रेल्वे उत्तर वॉर्डात रहायचो मात्र तेथे निवारा नसल्याने येथे आला आहोत़
-आनंदा महाले
सुविधादेखील नाहीत
4रेल्वे उत्तर वॉर्डातील रहिवासी आहोत़ घरकुलात कुठल्याही सुविधा नाहीत़ पाण्यासह लाईटसाठी नगरसेवक रवींद्र खरात यांना बोलावले होत़े पालिकेने  तेथे राहू देण्यास परवानगी द्यावी़
-चंद्रमणी
पोटावर पाय का ठेवता
415 वर्ष घरकूल पडून होते, तेव्हा तुम्ही काय केल़े गरीब लोकांना बाहेर का काढता? पालिकेने साधे ढुंकूनही पाहिले नाही़ आमच्यामुळे निवडून आले, मात्र गरिबांच्या पोटावर पाय का ठेवता?
-प्रकाश मोरे
पंतप्रधान योजनेचा लाभ घ्यावा : रमण भोळे
4पंतप्रधान आवास योजनेचा लाभार्थीनी लाभ घ्या़ 51 शहरात भुसावळची निवड असून लाभार्थीला साडेतीन लाख रुपये अनुदान मिळणार आहे, असे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाल़े चार स्तरांमध्ये सव्र्हे केला जाईल़ काही दिवस घरकुलात राहता येईल, मात्र कायदेशीर कारवाई करणे क्रमप्राप्त आह़े
रेणुकामाता मंदिराची जमीन देता येईल : लोणारी
4लॉटरी पद्धतीने ड्रॉ काढून दारिद्रय़ रेषेखालील निकषात बसणा:यांना घरकूल वाटप करण्यात येणार आह़े पालिका व सत्ताधा:यांना नियमाबाहेर जाता येणार नाही, जिल्हाधिकारी याबाबत निर्णय घेतील, असे सांगत उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी रेणुका माता मंदिराच्या जमिनीचा पर्याय सूचवला़
घरकुलातील नागरिकांवर सोपवला निर्णय
4अनधिकृतरित्या घरकुलात राहणा:या नागरिकांनी काय तो योग्य निर्णय घ्यावा, असा सूर पालिकेच्या बैठकीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिका:यांच्या बोलण्यातून उमटला़ त्यामुळे पुढील निर्णयाकडे लक्ष लागून आह़े अतिक्रमण काढण्यावर पालिका प्रशासन मात्र ठाम आह़े

Web Title: Give the shelter of the right, then only take out the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.