ईदसाठी बाजारात विशेष सुट द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:16 AM2021-05-12T04:16:43+5:302021-05-12T04:16:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रमजान पर्व अंतिम चरणात गुरुवारी किंवा शुक्रवारी चंद्र दर्शनानंतर रमजान ईद साजरी होईल. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रमजान पर्व अंतिम चरणात गुरुवारी किंवा शुक्रवारी चंद्र दर्शनानंतर रमजान ईद साजरी होईल. याकाळात ११ ते १४ मे या तीन दिवसांसाठी बाजाराच्या वेळेत सवलत देण्याची मागणी जिल्हा मुस्लीम इदगाह व कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक यांनी केली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन निवेदनदेखील दिले.
त्यांनी लहान मुलांचे कपडे, खेळणी, इतर साहित्य, सुकामेवा, धान्य व इतर बाबींना परवानगी देण्याची मागणी केली आहे. राज्यात लातूरमध्ये अशी विशेष परवानगी देण्यात आली आहे. ही दुकाने सकाळी १० ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते ६ यावेळेत सुरू करण्याची मागणीही ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यावर जिल्हाधिकारी राऊत यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी ट्रस्टचे सचिव फारुक शेख उपस्थित होते.